Job Opportunity in CIDCO : 'सिडको' महामंडळात होणार 101 सहाय्यक अभियंता पदांची भरती; त्वरित करा अर्ज!

Job Opportunity City and Industrial Development Corporation of Maharashtra : अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांसाठी सिडकोमध्ये नोकरी करण्याची संधी
CIDCO JOBnama
CIDCO JOBnamaSarkarnama
Published on
Updated on

CIDCO Recruitment : नोकरीच्या शोधातील अभियांत्रिकीची पदवी प्राप्त असलेल्या उमेदवारांसाठी सिडकोमध्ये नोकरी करण्याची संधी आहे. सिडकोने सहाय्यक अभियंता या संवर्गातील रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात.. (Job Opportunity in CIDCO)

नगर नियोजन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडको महामंडळाच्या वतीने सहाय्यक अभियंता पदाची भरती काढली आहे. सिडकोच्या वतीने एकूण 101 रिक्त जागांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 38, अनुसूचित जातींसाठी 13, अनुसूचित जमातींसाठी 7, ओबीसींसाठी 19 आणि इतर प्रवर्गासाठी 24 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

CIDCO JOBnama
Nashik Income Tax Raid : नाशिकमध्ये बिल्डर, कंत्राटदारांवर छापे

शैक्षणिक पात्रता

सिडकोच्या वतीने करण्यात येणाऱ्या या सहाय्यक अभियंता पदासाठी उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त असावा. तसेच उमेदवाराकडे SAP ERP प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. (Education Qualification)

निवडीचे निकष

या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 18 जानेवारी 2024 पर्यंत खुल्या प्रवर्गासाठी जास्तीत जास्त 38 आणि मागासवर्ग प्रवर्गातील उमेदवारांसाठी 43 वर्षे इतके राहील. तसेच या भरतीसाठीची उमेदवाराची निवड ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांची 200 गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी 2 तासांचा वेळ दिला जाणार आहे. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. या परीक्षेत 90 गुण प्राप्त करणारेच उमेदवार पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरवले जाणार आहेत. सॅप प्रमाणपत्रासाठी उमेदवारांना 10 गुण दिले जाणार आहेत. (Selection criteria)

CIDCO JOBnama
Budget Session 2024 : राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील प्रत्येक वाक्यावर वाजली बाकं; मोदीही थकले नाहीत…

अर्ज प्रक्रिया

सिडकोच्या या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे. त्यासाठी 'आयबीपीएस'च्या (https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/ ) या संकेतस्थळावर आपला अर्ज भरायचा आहे. या भरतीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून 1180 रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 1062 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत आहे. (Application Process) या भरतीच्या अधिक माहितीसाठी जाहिरातीच्या लिंकवर भेट द्यावी. https://drive.google.com/file/d/1K3Y_9OmRte67k9A4XMkFGI3A39dprH6d/view

R...

CIDCO JOBnama
CRPF Recruitment : क्रीडापटूंना CRPF मध्ये नोकरीची संधी; 169 जागांसाठी भरती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com