Home Guard News: होमगार्ड व्हायचयं! अर्ज करा; बारावी उत्तीर्णांना संधी..

JOG News: माजी सैनिकांसाठी वयाची कमाल मर्यादा 54 वर्ष इतकी असेल
Home Guard News
Home Guard NewsSarkarnama
Published on
Updated on

नोकरीच्या शोधात असलेल्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी होमगार्ड म्हणून काम करण्याची मोठी संधी आहे. दिल्ली होमगार्ड विभागाने होमगार्डची मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 10285 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

होमगार्डच्या मेगा भरतीसाठी इच्छुक असलेला उमेदवार हा बारावी पास असावा. तसेच या भरतीसाठी माजी सैनिकासाठी शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय हे 20 ते 45 वर्षे असावे.

Home Guard News
Budget 2024 Updates: निवडणुकीचे वर्ष तरीही इन्कम टॅक्स जैसे थे; मोदी सरकारचा आत्मविश्वास वाढला

उमेदवार हा 02-01-1979 पूर्वी जन्म झालेला नसावा तसेच 01-01-2004 रोजी त्याचे वय जास्तीत जास्त 45 असावे माजी सैनिकांसाठी वयाची कमाल मर्यादा 54 वर्ष इतकी असेल.या भरतीसाठी उमेदवाराची शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. यासाठी पुरूष उमेदवाराची उंची किमान 165 cm आणि महिला उमेदवारांसाठी किमान उंची 152 cm असावी.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज https://dghgenrollment.in/ या अधिकृत वेबसाईटवर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 13 फेब्रुवारी 2024 असणार आहे. होमगार्ड भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून भरती शुल्क आकारले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज करताना 100 रुपये अर्जाचे शुल्क ऑनलाईन भरना करायचे आहे. तसेच अर्ज करत असताना उमेदवाराने आपला अर्ज अचूक भरायचा आहे. यासाठी उमेदवाराने ओळख पत्र म्हणून आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा पासपोर्ट जोडावे. अधिक माहितीसाठी उमेदावारांनी पुढील लिंकवर भेट द्यावी -https://dghgenrollment.in/

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com