Cyber fraud in India Sarkarnama
प्रशासन

Cyber fraud in India : खळबळजनक घटना! सायबर गुन्हेगारांनी 50 लाखांना गंडवलं; सचिवालयातील दाम्पत्याची आत्महत्या

Belgaum Karnataka Maharashtra Secretariat government officer couple suicide defrauded 50 lakh cyber criminals : कर्नाटक बेळगावमधील रहिवाशी निवृत्त सरकारी अधिकारी दाम्पत्याने सायबर गुन्हेगारांनी 50 लाख रुपयांचा गंडा घातल्यानंतर आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Pradeep Pendhare

Karnataka Belgaum couple suicide : सायबर गुन्हेगारांमुळे महाराष्ट्र सचिवालयातून निवृत्त झालेल्या कर्नाटक बेळगावमधील अधिकारी दाम्पत्याने आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

दियांगो (वय 83) तर त्यांची पत्नी पलवियाना (वय 79) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नावं आहेत. या दाम्पत्याने चिठ्ठीत सायबर गुन्हेगारांनी जाळ्यात कसे अडकवले, आणि त्यातून कसे वेठीस धरलो गेलो, हे लिहून ठेवलं आहे.

दियांगो आणि पलवियाना हे महाराष्ट्र (Maharashtra) सचिवालयातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. या दोघा दाम्पत्याला संतती आणि नातेवाईक नसल्याचे देखील समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी या दाम्पत्याला दिल्ली गुन्हे शाखेतील अधिकारी असल्याचे सांगून वेठीस धरले होते.

सायबर गुन्हेगारांनी (Cyber Fraud) व्हिडिओ कॉलवरुन या दाम्पत्याशी संपर्क साधला. दोघांचाही गुन्हेगारीमध्ये सहभाग असल्याचा सांगून वेठीस धरले. तुमचा मोबाईल क्रमांक आणि ओळखपत्रांचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. गुन्हा सेटलमेंट करायचा असेल, तर प्राथमिक शुल्क पाच लाख रुपये भरावे लागेल, असे सायबर गुन्हेगारांनी सांगितले.

यानंतर सायबर गुन्हेगारांनी अनेकदा फोन करून या दाम्पत्याला भीती दाखवली. या दोघांकडून वेळोवेळी पैसे उकळले. तब्बल 50 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी उकळले. हा सगळा प्रकार दाम्पत्याने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

पोलिसांना सुरवातीला हत्या वाटली. दियांगो यांचा गळा चिरलेला होता, तर त्यांची पत्नी पलवियाना यांनी विषारी द्रव्य घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी या दोघांचा मोबाईल ताब्यात घेतल्यावर अन् कॉल रेकॉर्ड तपासल्यावर सर्व घटनाक्रम समोर आला. बेळगावमधील रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या दाम्पत्याच्या बँक खात्याची देखील तपासी सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT