Ladki Bahin Yojana Sarkarnama
प्रशासन

Ladki Bahin Yojna: राज्यात 288 शहरांत आचारसंहिता लागू; लाडक्या बहिणींना पैसे मिळणार का?

Ladki Bahin Yojna 2025 : राज्य निवडणूक आयोकडून मंगळवारी स्थानिक स्वराज्यं संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली. त्यामुळं २८८ निमशहरांमध्ये तात्काळ प्रभावानं आचारसंहिता लागू झाली आहे.

Amit Ujagare

Ladki Bahin Yojna 2025 : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांची राज्य निवडणूक आयोकडून मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यामुळं २८८ निमशहरांमध्ये तात्काळ प्रभावानं निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळं आता लाडकी बहीण योजनेलाही ब्रेक लागण्याची शक्यता आहे. आजपासूनच काही लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली होती. पण याला अचानक ब्रेक लागू शकतो. पण या योजनेला खरोखरच ब्रेक लागला तर पुढील वर्षी जानेवारी २०२६ पर्यंत या निधीचं वाटप होऊ शकणार नाही. पण याबाबत अद्याप सरकारकडून कुठलंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

विधानसभा निवडणुकीच्या काळात पैसे थांबवले

गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला राज्य शासनाकडून सुरुवात झाली. नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या तत्पूर्वी २२ ऑक्टोबर २०२४ भारतीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागू झाल्यानं नागरिकांना लाभाच्या योजना सरकारला सुरु ठेवता येत नाहीत. यामुळं मतदानावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळं आदर्श निवडणूक आचारसंहितेच्या कायद्यातच अशा योजना थांबवण्याबाबत म्हटलं आहे. त्यामुळंच राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली त्यानंतर राज्य शासनानं एक स्वतंत्र अध्यादेश काढत लाडकी बहीण योजनेचा निधी तीन महिन्यांसाठी थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये निवडणूक पार पडल्यानंतर थेट डिसेंबर २०२४ मध्ये लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते.

आजपासून खात्यात पैसे यायला सुरुवात

हाच निकष आत्ता जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी देखील लागू होऊ शकतो. पण कालच अर्थात ३ नोव्हेंबर २०२५ रोजी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करुन ऑक्टोबर महिन्याचे लाडक्या बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात आजपासूनच जमा व्हायला सुरुवात होतील, पुढचे तीन दिवस लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. पण पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज ४ नोव्हेंबर २०२५ रोजी राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा केली, त्यामुळं तात्काळ प्रभावानं आचारसंहिता देखील लागू झाली. त्यामुळं आता उद्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

सरकारचं अद्याप स्पष्टीकरण नाही

दरम्यान, आचारसंहितेमुळं लाडक्या बहिणींचा हप्ता अडकून पडणार की नाही? याबाबत अद्याप राज्य शासनानं कुठलंही अधिकृत निवदेन जाहीर केलेलं नाही. त्यामुळं लाभार्थ्यांना पैसे मिळणार की नाही? हा संभ्रम कायम आहे. पण कुठल्याही क्षणी यावर सरकारकडून स्पष्टीकरण येऊ शकतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT