Pune News: मतदार यादीत आपले नाव शोधणे, मतदान केंद्र शोधणे काही जणांना अवघड जाते, अशा मतदारांना 'पी.एस.जिओ पोर्टल’ उपयुक्त ठरत आहे. महाराष्ट्र सुदूर संवेदन व उपयोजन केंद्र पुणेच्या (एमआरएसएसी) साहाय्याने हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्याव्दारे मतदारांना आपले मतदान केंद्र सहजरित्या (Locate Your Polling Station) शोधण्यासाठी व तेथे पोहचण्यास मदत होणार आहे.
मावळ, शिरूर व पुणे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची माहिती या पोर्टलमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. संगणकावर क्यूआर कोड स्कॅन करावा. या पोर्टलवर मतदारास आपला विधानसभा मतदारसंघ व त्यातील मतदान केंद्राचे नाव किंवा क्रमांक वापरून त्याचे अचूक
भौगोलिक स्थान नकाशावर आपल्यासमोर दिसेल व दिसलेल्या ठिकाणी क्लिक केल्यास आपल्याला मतदान केंद्राची माहिती मिळेल,अशी माहिती एमआरएसएसी, पुणेचे प्रमुख डॉ.संजय पाटील यांनी दिली.
‘पी.एस. जिओ पोर्टल’ची लिंक क्लिक केल्यानंतर उजव्या कोपऱ्यात विधानसभा मतदारसंघ आणि मतदान केंद्राचे नाव निवडावे.
मतदान केंद्रावर क्लिक केल्यानंतर मॅपवर निळ्या रंगाचे मतदान केंद्राचे लोकेशन दिसेल.
त्याला क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूस मतदान केंद्राचा तपशील येईल.
‘डायरेक्शन’ समोरील व्ह्यू या शब्दाला क्लिक केल्यावर गुगल मॅपवर मतदान केंद्र शोधता येईल.
पोर्टलची लिंक क्युआरकोडद्वारेही ओपन करता येईल..
भौगोलिक स्थान नकाशावर आपल्यासमोर दिसेल व दिसलेल्या ठिकाणी क्लिक केल्यास मतदान केंद्राची माहिती मिळेल
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.