Devendra Fadnavis Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Government : राज्यातील 84 हजार आशा सेविकांसह 21 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी लवकरच महत्वपूर्ण निर्णय

ESIS Scheme Maharashtra, ASHA Workers Maharashtra : राज्यातील हजारो कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ मिळणार आहे.

Rajanand More

Maharashtra ASHA Workers News : राज्यातील आशा स्वयंसेविका व एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजनेच्या (ESIS) कक्षेत आणण्यासाठी आरोग्य विभागाकडून लवकरच महत्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांना योजनेचा लाभ मिळाल्यास त्यांच्यावरील वैद्यकीय खर्चाचा भार कमी होईल. तसेच अपघात, गंभीर आजार आणि मातृत्वाच्या काळात आर्थिक आधार मिळू शकणार आहे.

राज्यात सुमारे ८४ हजार आशा स्वयंसेविका आहेत. कंत्राटी तत्वावर भरलेल्या २१ हजारांहून कमी वेतन असलेल्या आरोग्य विभागातील (NHM) कर्मचाऱ्यांनाही या योजनेचा फायदा देण्याचा सरकारचा विचार आहे. त्यांना राज्य कामगार विमा योजना लागू करण्याबाबत गुरूवारी मुंबईत बैठक झाली.

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी ही योजना लागू करण्याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. बैठकीत आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक, आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी तसेच पतसंस्था कर्मचारी, रेशन दुकानातील कामगार, खाजगी शाळांचे कर्मचारी, स्वयंरोजगार संस्था, वाचनालयातील कर्मचारी अशा 21 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या घटकांना (NHM) राज्य कामगार विमा योजनेचा लाभ देण्याच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण चर्चा झाली.

या प्रस्तावामुळे राज्यातील हजारो कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सुरक्षिततेचा लाभ मिळणार आहे. राज्यात सुमारे ८४ हजार आशा सेविका कार्यरत असून, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध योजना प्रभावीपणे पाहोचवत आहेत. ही योजना लागू झाल्यास त्यांच्यासह अन्य घटकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT