Maharashtra government employees (File Photo) 
प्रशासन

Maharashtra government news : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी दिवाळी भेट; सण अग्रिम रकमेत भरघोस वाढ

Maharashtra government employees, Diwali gift to employees : शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या दहा सणांसह सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच निर्णय लागू होणार आहे.

Rajanand More

Festival advance Maharashtra update : राज्य सरकारने अराजपत्रित कर्मचाऱ्यांना मोठी दिवाळी भेट दिली आहे. ग्रेड वेतन ४ हजार ८०० पेक्षा कमी असलेल्या अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सण अग्रिम रकमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. सरकारने दहा सणांसाठी ही रक्कम आता २० हजार रुपये एवढी केली आहे.

वित्त विभागाने गुरूवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. ता. १ जानेवारी २००६ पासून सुधारित करण्यात आलेल्या वेतन संरचनेतील अराजपत्रित राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी अग्रिम सण रक्कम १२ हजार ५०० एवढी होती. त्यामध्ये आता ७ हजार ५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या दहा सणांसह सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी घोषित करण्यात येणाऱ्या सणांसाठीच सण अग्रिमचा निर्णय लागू होणार आहे. सरसकट सर्व सणांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही. या सणांमध्ये दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस आदी सणांचा समावेश आहे.

पुढील दहा सणांचा GR मध्ये उल्लेख

दिवाळी, रमझान ईद, ख्रिसमस, पारसी नववर्ष, संवस्तरी, रोश-होशना, वैशाखी पौर्णिमा (भगवान बुध्द जयंती), स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि डॉ. आंबेडकर जयंती या दहा सणांचा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आला आहे.

सण अग्रिम मंजूरी आणि वसूलीच्या अटी व शर्ती पूर्वी विहित केल्याप्रमाणेच राहतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. तसेच हे आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासूनच निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुंबई वित्तीय नियम, १९५९ मधील नियम क्रमांक १४२(जे) मध्ये योग्य ती सुधारणा यशावकाश करण्यात येईल, असेही सरकारने म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT