Government officials briefing media about Maharashtra’s new GR on MLA-MP respect guidelines. The image highlights protocol measures and administrative compliance. Sarkarnama
प्रशासन

Maharashtra Government : आमदार-खासदारांचा मानमरातब राखण्यासाठी राज्य शासनाचा नवा जीआर; अधिकाऱ्यांना आता उभं राहून अभिवादन करावं लागणार

Maharashtra government GR : शासन निर्णयात विधानमंडळ सदस्य/संसद सदस्य कार्यालयास भेट देतील, त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी. तसंच आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 21 Nov : विधानमंडळ तसेच संसद सदस्यांना सन्मानाची आणि सौजन्याची वागणूक देण्याबाबत राज्य सरकारने नवा जीआर गुरूवारी (ता.20) काढला आहे. या जीआरमध्ये राज्यातील आमदार खासदारांना सन्मानाची वागणूक मिळण्यासंदर्भात काही मार्गदर्शक तत्वे नमूद केली आहेत.

या जीआरमधून सर्व मंत्रालयीन प्रशासनिक विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख, कार्यालय प्रमुख शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, संस्था, मंडळे, महामंडळे, शासन नियंत्रित संस्थांमधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विशेष मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

या शासन निर्णयात विधानमंडळ सदस्य/संसद सदस्य कार्यालयास भेट देतील, त्यावेळी त्यांना संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना आदराची व सौजन्याची वागणूक द्यावी. तसंच आमदार खासदारांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐकून त्यांना लवकरात लवकर मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासह विधानमंडळ, संसद सदस्य भेटायला येतील आणि जेव्हा ते परत जातील तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यांना उभे राहून अभिवादन करण्याचा आदेश देखील या जीआरमध्ये आहे. त्यासोबतच आमदार, खासदारांशी मोबाईलवर बोलताना नेहमी आदरयुक्त भाषा व शिष्टाचार पाळावा, असंही या निर्णयात म्हटलं आहे.

यासह विधानमंडळ सदस्य, संसद सदस्य यांची भेट आणि कामांचा आढावा याकरीता दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी दोन तासाची राखीव वेळ सुनिश्चित करून ती पूर्व प्रसिद्ध करण्याच्या सूचना देखील संबंधित अधिकाऱ्यांनी द्यावी असं या जीआरमध्ये नमूद केलं आहे.

शिवाय कोणत्याही शासकीय कार्यक्रम पत्रिकेत नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत ज्या जिल्ह्यात स्थानिक, राज्यस्तरीय, शासकीय भूमिपूजन, उद्घाटन, इत्यादीं कार्यक्रम असेल त्या जिल्हयातील सर्व केंद्रीय व राज्यातील मंत्री, राज्यमंत्री, त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, स्थानिक सर्वपक्षीय विधानमंडळ सदस्य.

संसद सदस्य, महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष नगराध्यक्ष, सरपंच अशा लोकप्रतिनिधींना आमंत्रित करावे आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडून खात्री करुनच कार्यक्रम पत्रिकेत संबंधित लोकप्रतिनिधींची नावे अचूक व योग्यरित्या राजशिष्टाचारानुसार छापावीत असं या शासन निर्णयात नमूद केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT