Uddhav Thackeray : पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरींच्या पक्ष प्रवेशाला स्थगिती, पण ठाकरेंनी 'तो' प्रश्न उपस्थित करत भाजपची केली मोठी कोंडी

Uddhav Thackeray Attack on BJP : मी मुख्यमंत्री असताना भाजपनं साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती. तेव्हा भाजपने शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगितलं आणि आता त्याच चौधरीला पक्षात प्रवेश दिला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray addressing senior Shiv Sainiks during the foundation day event, launching a sharp attack on BJP and Shinde. The moment captures intense Maharashtra politics discourse.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 21 Nov : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरेंनी ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष वर्धापन दिन सोहळ्यात बोलताना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी त्यांनी पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून भाजप आणि फडणवीसांनी शिवसेना आणि हिंदूंची माफी मागावी, असं वक्तव्य केलं. ते म्हणाले, 'कोणालाही पक्षात घेतायत. पालघर येथे भाजपने एकाला प्रवेश दिला.

त्या चौधरीला भाजपमध्ये प्रवेश दिला. मी मुख्यमंत्री असताना भाजपनं साधू हत्याकांडातील आरोपी म्हणून किती बोंबाबोंब केली होती. तेव्हा भाजपने शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगितलं आणि आता त्याच चौधरीला पक्षात प्रवेश दिला.

Uddhav Thackeray
Thane Politics : गणेश नाईकांनी जुने नेटवर्क पुन्हा अॅक्टिव्ह केलं; प्रताप सरनाईकांना त्यांच्या मतदारसंघात चॅलेंज!

हा हिंदुत्वाचा अपमान नाही? फडणवीस म्हणतात स्थानिक पातळीवर चौकशी केली होती. तो चौधरी या हत्याकांडात सामील असेल तर प्रवेश का दिला? आणि नसेल तर प्रवेश का थांबवला? त्याचा संबंध नसेल तर भाजपनं आणि फडणवीसांनी चौधरीची, हिंदूंची आणि शिवसेनेची माफी मागितली पाहिजे.'

दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, 25 वर्ष ज्यांचे हिंदुत्व या एका शब्दासाठी चोचले ऐकले मान्य केले. महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हते त्यांना खांद्यावर घेऊन खेड्यापाड्यात घेऊन फिरलो. ते वरती चढल्यानंतर आपल्याला लाथा मारायला लागले, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.

Uddhav Thackeray
Eknath Shinde Vs BJP : तक्रार घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना अमित शाहांनी उलटं सुनावलं? म्हणाले, 'तुम्हाला लोकं...'

तर मराठ्यांच्या घोड्यांच्या टापाने दिल्ली थरथरत होती, दिल्लीचेही तख्त राखतो तो खरा मराठा, आपण मध्ये मध्ये बघतो ते दिल्लीचेही बूट चाटतात, ते भगव्याच्या औलदीचे नाहीत, गद्दार आहेत. आता जे दिल्लीला कायम जातायत ते मुजरे मारायला तिकडे जातात. त्यांचे हुजरे काय विचार पुढं नेणार आहेत, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्लीवारीवर टीका केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com