Farmers will visit countries like Israel, Japan, Netherlands, and South Korea to study modern agriculture technologies under a government-funded scheme Sarkarnama
प्रशासन

Agriculture Subsidy Scheme : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! प्रगत तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शासनाकडून मिळणार 1 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

Farmer Study Tour Abroad : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता परदेशात जाऊन शेती पाहण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26' ही योजना राबविण्यात येणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News, 20 Jul : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता परदेशात जाऊन शेती पाहण्याची संधी सरकारने उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी 'शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन 2025-26' ही योजना राबविण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत युरोप-नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इस्त्राईल, जपान, मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स, चीन, दक्षिण कोरिया या देशांत शेतकऱ्यांचे अभ्यासदौरे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 31 जुलै पर्यंत असणार आहे.

युरोपातील नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स या देशांत फलोत्पादन, सेंद्रिय शेती आणि दुग्धोत्पादन, इस्राईलमध्ये आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पाणी व्यवस्थापन व कृषी यांत्रिकीकरण,जपानची सेंद्रिय शेती, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, ही तेथील शेतीची वैशिष्ट्ये आहेत.

मलेशिया, व्हिएतनाम व फिलिपाईन्स या देशांत फळे व भाजीपाला पिकांचे काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान, चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो, दक्षिण कोरिया देशात आधुनिक कृषी अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान पाहायला मिळाणार आहे.

शेतकरी अभ्यास दौऱ्याकरिता निवडीचे निकष म्हणजे, लाभार्थी हा स्वतः शेतकरी असावा. स्वतःच्या नावे चालू कालावधीचा 7/12 व 8-अ उतारा, उत्पन्नाचे मुख्य साधन शेती असल्याचे स्वयंघोषणापत्र, शेतकऱ्याचा अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे आवश्यक आहे.

शेतकरी कुटुंबामधून फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल. शासनाकडून अभ्यास दौऱ्याकरिता सर्व घटकांतील (संवर्गातील) शेतकऱ्यांना एकूण खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त रुपये एक लाख प्रती लाभार्थ्यांना कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देय आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT