Manikrao Kokate Video Viral : कृषीमंत्री कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल, रोहित पवारांच्या ट्विटने खळबळ!

Manikrao Kokate Rohit Pawar : सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला आहे.
Agriculture Minister Manikrao Kokate’s viral rummy-playing video sparks political uproar after Rohit Pawar’s tweet.
Agriculture Minister Manikrao Kokate’s viral rummy-playing video sparks political uproar after Rohit Pawar’s tweet.sarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News : कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळताचा व्हिडिओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबा कर्जमाफीद्या, असे ट्विटमध्ये हॅशटॅग वापरत कोकाटेंना टोला लगावला आहे.

'सरकारनामा' या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दरम्यान, रोहित पवारांनी म्हटले आहे की, 'सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.'

'रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का?' असा प्रश्न देखील रोहित पवार यांनी विचारला आहे.

Agriculture Minister Manikrao Kokate’s viral rummy-playing video sparks political uproar after Rohit Pawar’s tweet.
Uddhav Thackeray interview : "चर्चा होईल, पण..."; राज ठाकरेंसोबत युती होणार का? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

महायुतीचे मंत्री, आमदार अडचणीत

पावसाळी अधिवेशनाच्या काळात मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यामध्ये ते बनियावर बसलेले दिसून येत आहेत तर त्यांच्या खोलीत पैशांची बॅग भरून ठेवलेली दिसत आहे. या व्हिडिओनंतर शिरसाट यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत होती. त्याआधी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीमध्ये कॅन्टीनचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. आणि आता कृषीमंत्रीच फोनवर रमी गेम खेळताना दिसत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आमदार आणि मंत्र्यांमुळे महायुतीचे सरकार अडचणीत येत असल्याची चर्चा आहे.

Agriculture Minister Manikrao Kokate’s viral rummy-playing video sparks political uproar after Rohit Pawar’s tweet.
Maharashtra Politics: हाॅटेलमध्ये आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची भेट? सत्य काय ते समोर आलं; स्वतः फडणवीस म्हणाले, 'आम्ही समोरासमोर...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com