Uddhav Thackeray interview : "चर्चा होईल, पण..."; राज ठाकरेंसोबत युती होणार का? राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत करण्यात आला आहे.
Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliancesarkarnama
Published on
Updated on

Uddhav-Raj Thackeray Alliance : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याच पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक तथा खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसारीत करण्यात आला आहे.

या भागात त्यांनी राज ठाकरेंसोबतची युती, मराठीचा मुद्दा आणि पहलगाम येथील दहशतवादी हल्ला या संबंधित विचारलेल्या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिली आहेत. या मुलाखतीत त्यांनी राज आणि मी एकत्र आलो तर प्रॉब्लेम कुणाला आहे? ज्यांना प्रॉब्लेम आहे, त्यांचं ते बघतील, असं म्हटलं.

या मुलाखतीत, हिंदी सक्तीविरुद्ध शिवसेना आणि मनसेने एकत्रित मोर्चा काढण्याचं जाहीर करताच त्याची देशभरात चर्चा झाली की, सगळ्या 20 वर्षांच्या कालखंडानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले, असं संजय राऊतांनी विचारताच उद्धव ठाकरेंनी प्रतिप्रश्न केला की, "आम्ही एकत्र आल्यामुळे प्रॉब्लेम कुणाला आहे? ज्यांना प्रॉब्लेम आहे ते त्यांचं ते बघतील, आपण का विचार करायचा?"

ते पुढे म्हणाले, आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करत आहेत. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
Dharashiv Politics : प्रताप सरनाईकांच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर, स्वागतासाठी लावलेले बॅनर फाडले

यानंतर तुम्ही दोघे एकत्र आल्यामुळे सरकारला माघार घ्यावी लागली का असं विचारताच ठाकरे म्हणाले, होय, नक्कीच सरकारला माघार घ्यावी लागली. दरम्यान, त्या मंचावर राज ठाकरे असे म्हणाले की, बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते साकार होईल. तुम्हीही असं वारंवार म्हणालात की, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू. याचा अर्थ महाराष्ट्राने काय घ्यायचा? असा प्रश्न राऊतांनी विचारला.

Sanjay Raut on Uddhav and Raj Thackeray reunite And INDIA Alliance
भाजप-शिवसेनाच ओढतीय राष्ट्रवादीचे पाय ; सांगलीत प्रवेशाचा मार्गावर असलेला दुसरा नेता पळवला

त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, लोकांच्या मनात जे आहे ते आम्ही साकार करू असाच याचा अर्थ आहे. मराठी माणसाने मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलं पाहिजे. कारण शेवटी आम्ही कोणासाठी लढतोय? मराठी माणसासाठीच. आता 20 वर्षांनी एकत्र आलोय. प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असं नाही. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्र धर्मासाठी, मराठी माणसासाठी जे जे करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी माझी तयारी आहे.

यासंदर्भात राज ठाकरेंशी चर्चाही होईल, पण त्याआधी आता 20 वर्षांनी एकत्र तर आलोय. हेही नसे थोडके! हे खूप मोठे आहे. म्हणून मी त्या दिवशीच्या भाषणात म्हटले की, आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेसोबत युतीसाठी सकारात्मकता दाखवत आपण राज यांच्याशी चर्चा करायलाही तयार असल्याचं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com