Maharashtra transport department Sarkarnama
प्रशासन

HSRP number plate : वाहनधारकांनो, एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी उरले काही तास; 1 जुलैपासून कडक कारवाई, कोणत्या वाहनांना सूट?

Maharashtra vehicle rules, HSRP deadline : नंबर प्लेट नसल्यास पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करणार आहेत.

Rajanand More

Maharashtra transport department : राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. ही नंबर प्लेट बसविण्यासाठी राज्याच्या परिवहन विभागाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत आहे. या मुदतीत नंबर प्लेट न बसविल्यास आता थेट कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

परिवहन विभागाकडून १ जुलैपासून नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई सुरू केली जाणार आहे. एवढेच नाही तर एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांची आरटीओमधील अनेक महत्त्वाची कामेही रोखली जाणार आहेत. ता. ३० जूनपर्यंत एचएसआरपी बसविण्यासाठी अधिकृतपणे अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना कारवाईतून वगळण्यात येणार आहे.

आरटीओतील कोणती कामे रखडणार?

एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे किंवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोंदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारखी कामे रोखली जाणार आहेत. वाहनाच्या फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणाला यातून वगळण्यात आले आहे.

नंबर प्लेटसाठी तीन झोन

एचएसआरपी बसविण्याच्या कामासाठी राज्यात तीन झोन आहे. पहिल्या झोनसाठी रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड, दुसऱ्या झोनसाठी रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि तिसऱ्या झोनसाठी एफटीए एचएसआरपी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ऑनलाईन पध्दतीने अपॉइंटमेंट घेता येते.

नेमके दर किती?

राज्य सरकारने एचएसआरपी नंबर प्लेटसाठी अधिकृत दर निश्चित केले आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी मोटार वाहने आणि मध्यम व अवजड व्यावसायिक वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी वगळून, फिटमेंट शुल्कासह) आकारले जातात. यामध्ये वाहनधारकांना दोन पर्याय देण्यात आले आहेत.

पोलीस अन् आरटीओही कारवाई करणार

नंबर प्लेट नसल्यास केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील कलम १७७ अन्वये पोलीस आणि परिवहन विभाग हे संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करणार आहेत, अशी माहिती परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT