

Europe climate emergency : भारतामध्ये मान्सूनवर अल निनोचे सावट आहे. अनेक भागात पावसाने अद्याप हजेरीच लावलेली नाही. अनेक भागात तापमानाचा पारा अजूनही चढाच आहे. दुसरीकडे युरोपातही उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. युरोपातील अनेक देशांमध्ये ३० ते ३५ डिग्री तापमान असून त्यामुळे मागील दहा दिवसांत १३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
युरोपातील फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन आणि ब्रिटेन यांसह अन्य काही देशांमध्ये वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. जर्मनीत राहणाऱ्या एका भारतीय महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही महिला उत्तर प्रदेशातील ४५ ते ५० डिग्री सेल्सिअस तापमानाचे उदाहरण देत जर्मनीतील ३३ डिग्री तापमानही किती त्रासदायक आहे, याचा अनुभव सांगताना दिसत आहे.
महाराष्ट्रात विदर्भात आणि प्रामुख्याने चंद्रपूर भागातील तापमानाचा पारा उन्हाळ्यात अनेकदा ४५ डिग्रीपर्यंत पोहोचतो. तर राज्यातील अनेक भागातील सरासरी तापमान ३५ डिग्रीच्या जवळपास असते. पण युरोपात मात्र ३३ डिग्री तापमानही जीवघेणे ठरत आहे. हे तापमान म्हणजे युरोपात उष्णतेची लाट असल्याचे मानले जात आहे. लोकांना घराबाहेर पडणेही अशक्य होऊ लागले आहे.
नेमकं कारण काय?
मीडिया रिपोर्टनुसार, युरोपात मागील दहा दिवसांत १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामागची प्रमुख कारणेही समोर आली आहे. युरोपमध्ये बहुतेक काळ थंडीचा कहर असतो. त्यामुळे तेथील घरे, कार्यालये, सार्वजनिक इमारतींची रचना ही थंडीची तीव्रता लक्षात घेऊन करण्यात आलेली असते. घरातील वातावरण उष्ण राहील, अशी बांधणी केली जाते. त्याचाच त्रास आता तीव्र उन्हामुळे होताना दिसत आहे.
युरोपमध्ये उन्हाळ्यातील दिवसही खूप मोठा म्हणजे १५ ते १६ तासांचा असतो. यावेळी उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. त्यामुळे एवढे तास तीव्र उन्ह पडल्याने रात्रीच्या वेळीही घराप्रमाणे बाहेरही तापमान वाढीचा त्रास अधिक प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे युरोपातील लोकांना एवढ्या तीव्र उन्हाची सवय नाही.परिणामी, लोकांना हा उकाडा असह्य झाला असून १३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.