ips transfer .jpg Sarkarnama
प्रशासन

IPS transfers : राज्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच; पुणे, अमरावती, नागपूरला मिळाले नवे कारभारी

IPS transfers Maharashtra : देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. नुकतंच महायुती सरकारकडून मंगळवारी (ता.13) आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. अशातच आता आणखी 27 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 17 May : देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच आहे. नुकतंच महायुती सरकारकडून मंगळवारी (ता.13) आठ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.

अशातच आता आणखी 27 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीआधीच पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये शैलेश बलकवडे, ए.एच. चावरिया यांच्यासह अनेक बड्या पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्यामुळे आता पोलिस प्रशासनात बदलाचे वारे वाहू लागल्याचं दिसत आहे. तर राज्य सरकारने कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. ते जाणून घेऊया.

पुणे पोलिस गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे यांची आता मुंबई गुन्हे शाखेच्या अपर पोलिस आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर ए.एच. चावरिया यांच्याकडे अमरावती शहराच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे अनिल पारसकर यांची यांची पोलिस आयुक्त, संरक्षण व सुरक्षा मुंबई येथे बदली तर एम. रामकुमार यांची संचालक, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे येथे बदली करण्यात आली आहे, तर इतर अधिकाऱ्यांचे नाव आणि बदलीनंतर मिळालेले पद पुढीलप्रमाणे आहेत.

शशीकुमार मीना - अपर पोलीस आयुक्त, उत्तर प्रादेशिक विभाग, मुंबई.

प्रविण पाटील - नागपूर अपर पोलिस आयुक्त.

संजय बी. पाटील - अपर पोलिस आयुक्त पुणे.

वसंत परदेशी - अपर पोलिसआयुक्त, नागपूर शहर.

एस.डी. आव्हाड - अपर पोलिसआयुक्त, पिंपरी चिंचवड.

एस. टी. राठोड - पोलिस उप महानिरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी टास्क.

पी.पी. शेवाळे - पोलिसउप महानिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई.

विनिता साहु - अपर पोलिसआयुक्त, सशस्र पोलीस दल येथे बदली.

पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख हे आता पुणे अपर पोलिस आयुक्त बनले आहेत.

प्रसाद अक्कनवरु - पोलिस उप महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई.

अमोघ गावकर - पोलिस उप महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (प्रशासन), पुणे.

जी. श्रीधर - पोलिस उप महानिरीक्षक, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे.

सुरेश कुमार मेंगडे - मुख्य दक्षता अधिकारी, सिडको, नवी मुंबई.

धनंजय कुलकर्णी - अपर पोलिस आयुक्त, विशेष शाखा, मुंबई.

विजय मगर - रा र पोलिस उप महानिरीक्षक म्हणून बदली.

राजेश बनसोडे - अपर पोलिस आयुक्त, पुणे शहर.

मोक्षदा पाटील - पोलिस उप महानिरीक्षक, रा. रा. पोलीस बल.

राकेश कलासागर - पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई.

प्रियंका नारनवरे - अपर पोलिस आयुक्त, वाहतूक, मुंबई.

अरविंद साळवे - सहसंचालक, महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक.

विक्रम देशमाने - अपर पोलिस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग, मुंबई.

राजेंद्र दाभाडे यांची अपर पोलिस आयुक्त, नागपूर शहर येथे बदली करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT