Sanjay Raut : "ईडीने अटक करण्याआधी मला एकनाथ शिंदेंचा फोन आलेला..."; राऊतांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut book : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तुरूंगात असताना लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी (ता.17) होणार आहे. या पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्याची चर्चा संबंध देशात सुरू आहे. कारण राऊतांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
Eknath Shinde, Amit Shah,  Sanjay Raut
Eknath Shinde, Amit Shah, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 17 May : ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तुरूंगात असताना लिहिलेल्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकाचं प्रकाशन शनिवारी (ता.17) होणार आहे. या पुस्तक प्रकाशित होण्याआधीच त्याची चर्चा संबंध देशात सुरू आहे.

कारण राऊतांनी या पुस्तकातून अनेक खळबळजनक दावे केले आहेत. साहजिकच या पुस्तकातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता भाजपसह महायुतीमधील नेत्यांकडून या पुस्तकावर टीका केली जात आहे.

Eknath Shinde, Amit Shah,  Sanjay Raut
Sanjay Raut : PM मोदींशी वाद नव्हते, अमित शाह दिल्लीत आल्याने राजकीय व्यवस्थेचा...; राऊत नेमकं काय म्हणाले?

याच टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी शिंदे गटाचे प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा मला फोन आला होता, असं राऊत यांनी म्हटलं आहे. शिवाय मी नव्हे तर शिंदेंच नरकात आहेत, असा टोलाही त्यांनी शिंदेंना लगावला आहे.

माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांना एका पत्रकाराने, तुम्ही बाळासाहेबांचे विचार मानले असते तर नरकात जाण्याची वेळ आली नसती, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केल्याचं सांगितलं. यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, "आम्ही कुठे म्हणतो आम्ही नरकात गेलो. नरकात ते गेले.

शिंदेंचा संबंध काय? अटकेआधी त्यांचा मला फोन आला होता. मी अमित शहांशी बोलू का? त्यावर मी म्हणलं काही गरज नाही. तुम्ही वर बोलला तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही. मला उद्या अटक होतेय मी तुरूंगात जातोय, मी पळून जाणार नाही.

Eknath Shinde, Amit Shah,  Sanjay Raut
Pune BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गृहकलह, शहराध्यक्ष नियुक्ती कार्यक्रमाकडे पदाधिकाऱ्यांची पाठ ?

शिवाय वर बोलायची गरज नाही. शिवाय वर बोलण्यासाठी मी समर्थ आहे, असं आपण एकनाथ शिंदेंना फोनवरून सांगितल्याचंही राऊत यावेळी म्हणाले. त्यामुळे आता राऊतांच्या या दाव्यावर शिंदे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया दिली जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मी बालवाड्मय वाचत नाही - मुख्यमंत्री

दरम्यान, राऊतांच्या पुस्तकावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी बालवाड्मय वाचायचं बंद केल्याचं म्हणत टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, "मी कांदबऱ्या वाचनं कधीच सोडलेलं आहे. कथा-कांदबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं वय आता राहिलेलं नाही. त्याच्यामुळे मी असल्या गोष्टी वाचत नाही".

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com