PCMC : पिंपरी चिंचवडमधील 'त्या' 29 इमारतींचं बांधकाम पाडायला सुरूवात, कोर्टाच्या आदेशाची पालिकेकडून तात्काळ अंमलबजावणी

PCMC Illegal Bungalows Demolition : पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले जमीनदोस्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रहिवाशांनी केलेला अपील अर्ज फेटाळत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
PCMC
PCMCSarkarnama
Published on
Updated on

Pimpri-Chinchwad News, 17 May : पिंपरी चिंचवडमधील चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत बांधलेल्या 29 बेकादेशीर बंगले जमीनदोस्त करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. रहिवाशांनी केलेला अपील अर्ज फेटाळत न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

त्यामुळे रहिवाशांसह विकासकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. न्यायालयाने हरित लवादाने दिलेला निर्णय कायम ठेवत 31 मे पूर्वी या बेकायदेशीर बंगल्यांवर कारवाई करत नदीचे क्षेत्र पुन्हा मूळ स्थितीत आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून येथील रहिवाशांना केवळ दोन दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचं PCMC प्रशासनाने सांगितलं आहे.

PCMC
Pune BJP : निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गृहकलह, शहराध्यक्ष नियुक्ती कार्यक्रमाकडे पदाधिकाऱ्यांची पाठ ?

नेमकं प्रकरण काय?

चिखली परिसरात इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या प्रतिबंधित क्षेत्रात सदर बंगल्याची बांधकामे करण्यात येत होती. यामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आणून पर्यावरण संरक्षण कायद्यांचे उल्लंघन केले जात होते. तसंच संबंधित विकासकांनी पर्यावरण अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन केलं होतं.

त्यामुळे हरित लवादाने या बंगल्याचं बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या आदेशावर हरकत घेत संबंधित रहिवाशांसह विकासकांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे बंगल्यावरील कारवाई काही काळ रखडली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने रहिवाशांची याचिका फेटाळल्यामुळे ही बांधकामे पाडण्यात येणार आहेत.

PCMC
SSC Supplementary Exam 2025: दहावीत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचा अकरावीत जाण्याचा मार्ग मोकळा! 'या' तारखेला होणार पुरवणी परीक्षा

शिवाय सदर बांधकामे पावसाळ्यात पाडता येणार नसल्यामुळे ती 31 मेच्या आधीच हा बांधकामावर बुलडोझर चालवावा लागणार आहे. त्यानुसार आता पालिका कामाला लागली असून 29 बंगल्यावर आजच पोलिस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कोर्टाच्या आदेशानंतर पालिकेने तात्काळ कारवाई केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com