Police Recruitment Sarkarnama
प्रशासन

Police Recruitment: पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात; फॉर्म कसा भरायचा, सविस्तर जाणून घ्या!

Mumbai Police Bharti 2024: पोलिस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर अशा एकूण ३५२३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Police Bharti 2024: मुंबई पोलिस भरतीची जाहिरात निघाली असून, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई पोलिस विभाग अंतर्गत पोलिस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर अशा एकूण ३५२३ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे.

उमेदवार एका पदासाठी महाराष्ट्रात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. पोलिस भरती २०२४ साठी परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती, मैदानी चाचणी कशी होणार (ग्राउंड), शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे / कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी. सामाजिक, समांतर आरक्षण व अनाथांकरिता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत, असे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता

पोलिस शिपाई

12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}

पोलिस शिपाई चालक

  • पदाचे नाव – पोलिस शिपाई, बँड्समन आणि ड्रायव्हर

  • पद संख्या – ३५२३ जागा

  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)

  • वयोमर्यादा

  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे

  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे

  • नोकरी ठिकाण : मुंबई

  • अर्ज पद्धती – ऑनलाइन

  • अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ मार्च २०२४

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४

  • अधिकृत वेबसाइट policerecruitment2024.mahait.org

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT