Maharashtra VIP air travel (File Photo) Sarkarnama
प्रशासन

VIP Air Travel : राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर, विमान पुरविणाऱ्या एजन्सीला मुदतवाढ; सहा दिवसांत संपणार होता करार

Maharashtra government VIP Air Travel Contract Extended : राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर, विमाने भाडेतत्वावर घेतली जातात.

Rajanand More

Maharashtra VIP air travel agency contract : राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हवाई प्रवासासाठी भाडे तत्त्वावर हेलिकॉप्टर आणि विमान उपलब्ध करून घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दोन एजन्सी नियुक्त केल्या आहेत. या एजन्सीसोबत दोन वर्षांसाठी करार करण्यात आला होता. या कराराचा कालावधी ६ ऑक्टोबर रोजी संपणार आहे. नवीन निविदा प्रक्रिया लांबण्याचे कारण देत सरकारने कराराला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

सामान्य प्रशासन विभागाकडून याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने ७ ऑक्टोबर २०२४ ते ६ ऑक्टोबर २०२६ अशा दोन वर्षांच्या कालावधीसाठी साई एव्हीएशन व अॅरो एअरक्राफ्ट सेल्स अॅन्ड चार्टस् प्रा. लि. या दोन कंपन्यांची न्यूनत्तम दराने दोन वर्षांसाठी नियुक्त केली होती. त्यासाठी ई-निविदाप्रक्रिया राबविण्यात आली होती.

कराराचा कालावधी संपत असल्याने सरकारकडून नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे सुरू आहे. मात्र त्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी दोन कंपन्यासोबतचा करण्यात आलेल्या करारास मुदतवाढ देण्यात आली ही मुदतवाढ ७ ऑक्टोबरपासून पुढील सहा महिन्यांसाठी असणार आहे.

राज्य सरकारकडून विमानचालक संचालनालयाला तशी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे पुढील सहा महिने साई एव्हीएशन व अॅरो एअरक्राफ्ट सेल्स अॅन्ड चार्टस् प्रा. लि. या दोन कंपन्यांकडूनही राज्यातील अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर आणि विमाने भाडे तत्वावर उपलब्ध करून घेतली जाणार आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींसाठी या हवाई वाहनांचा वापर केला जातो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT