Rajya Sabha Candidate : वडील भाजपच्या पाठिंब्यावर खासदार, आता लेकाला काँग्रेसच्या मित्रपक्षाकडून तिकीट; 'NDA'ची कोंडी

Dhanraj Nathwani Rajya Sabha: Rajya Sabha ticket to son of BJP backed MP : धनराज नथवानी हे देशातील युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.
Dhanraj Nathwani
Dhanraj NathwaniSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rajya Sabha election Uttar Pradesh : देशाच्या राजकारणात अनेकदा सत्तेसाठी कट्टर विरोधक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले आहे. तर कधी पिता-पुत्र, काका-पुतण्या एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे दिसते. अशीच घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. समाजवादी पक्षाने राज्यसभेसाठी दोन उमेदवारांची घोषणा केली असून त्यातील एका नावाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.

उत्तर प्रदेशात राज्यसभेच्या दहा जागांसाठी निवडणूक होणार आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या किमान सात जागा सहजपणे निवडून येऊ शकतात. तर सपा व मित्रपक्षांचे दोन उमेदवार राज्यसभेत जातील. तिसऱ्या जागेसाठी रस्सीखेच आहे. मात्र, सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी धनराज परिमल नथवानी यांना राज्यसभेचे तिकीट देत एनडीएची कोंडी केल्याची चर्चा आहे.

धनराज नथवानी हे राज्यसभेचे खासदार परिमल नथवानी यांचे पुत्र आहेत. ते भाजपच्या पाठिंब्यावर झारखंडमधून खासदार म्हणून अटीतटीच्या लढतीत निवडून आले आहेत. त्या निवडणुकीत इंडिया आघाडीच्या आमदारांनी कॉस वोटिंग केल्याने काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यांच्याच लेकाला इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या सपानेही उमेदवारी दिली आहे.

Dhanraj Nathwani
BJP MLC candidates : भाजपकडून शिक्षक, पदवीधरच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; महाराष्ट्रात सस्पेन्स वाढला...

परिमल नथवानी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कॉर्पोरेट अफेयर्सचे संचालक असून देशातील उद्योग आणि राजकीय क्षेत्रातील मोठा चेहरा म्हणून परिचित आहेत. त्यांच्या राज्यसभेचा चौथा कार्यकाळ असून आतापर्यंत तीनवेळी अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत.

त्याचप्रमाणे धनराज हे देशातील युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. रियायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्येही मोठ्या पदावर कार्यरत आहेत. रिलायन्स जियोच्या देशव्यापी मोहिमेत त्यांची महत्वाची भूमिका आहे. तसेच रिलायन्सच्या अन्य कंपन्यांचीही महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

Dhanraj Nathwani
Beed Collector News : दुष्काळात तहसीलदार सुट्टीवर, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढला; प्रशासन हादरले...

समाजवादी पक्षाने धनराज यांना उमेदवारी देत प्रामुख्याने भाजपची कोंडी केली आहे. भाजपने त्यांच्या वडिलांना पाठिंबा दिला होता. त्यांना नेहमीच भाजपचा पाठिंबा राहिला आहे. त्यामुळे धनराज यांचा उत्तर प्रदेशातून राज्यसभेत जाण्याचा मार्ग सुकर असेल, अशी चर्चा आहे. समाजवादी पक्षाची तीन उमेदवार राज्यसभेत पाठविण्याची रणनीती असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com