Mahayuti Government : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नैमित्तिक रजेच्या नियमांबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय स्पष्ट केला आहे. या निर्णयानुसार, शासकीय कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या कॅज्युअल रजा (Casual Leave) मागे किंवा पुढे कितीही रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
वित्त विभागाने 2 मार्च 1981 रोजी दिलेल्या तात्पुरत्या परवानगीला आता कायमस्वरूपी स्वरूप दिले असून, तसे आदेश जारी केले आहेत.
या नवीन नियमावलीनुसार, कॅज्युअल रजेच्या सुरुवातीला (Prefix), रजेच्या शेवटी (Suffix) किंवा रजेच्या मधल्या काळात येणारे रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्ट्या आता कर्मचाऱ्यांना आपल्या रजेला जोडून घेता येतील.
दरम्यान, ही सवलत घेताना शासनाने काही मर्यादा देखील घालून दिल्या आहेत. एका वेळेस घेतलेली कॅज्युअल लिव्ह आणि त्याला जोडून घेतलेल्या सार्वजनिक सुट्ट्या असा एकूण कालावधी कोणत्याही परिस्थितीत ७ दिवसांपेक्षा जास्त होता कामा नये.
केवळ अत्यंत अपवादात्मक परिस्थितीमध्येच ही मर्यादा 10 दिवसांपर्यंत वाढवून देण्याची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सलग सुट्ट्यांचे नियोजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हा आदेश राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने वित्त विभागाचे उप सचिव व्यं. दे. पानसे यांनी जारी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.