SAI Recruitment Sarkarnama
प्रशासन

SAI Recruitment : स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियात मेगा भरती; क्रीडापटूंसाठी सुवर्णसंधी !

Job Opportunity in SAI Recruitment : नोकरीच्या शोधात असणाऱ्या क्रीडापटूंसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी...

Anand Surwase

Job News : नोकरीच्या शोधात असणाऱ्या क्रीडापटूंसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरणात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारत सरकारच्या अखत्यारितील स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाने विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्रता आणि निकष काय आहेत, याबाबतची सविस्तर माहिती जाणून घ्या...

स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाने खेळाडूंना विविध क्रीडाप्रकाराचे मार्गदर्शन करण्यासाठी 214 प्रशिक्षकांच्या पदांची भरती जाहीर केली आहे. यामध्ये हाय परफॉर्मन्स कोचच्या 09 जागा, सीनिअर कोचच्या 45 जागा, कोचच्या 4 आणि असिस्टंट कोचच्या 117 अशा एकूण विविध पदांच्या 214 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी या भरतीची सविस्तर जाहिरात वाचावी.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पात्रता आणि निकष

या भरतीसाठी उमेदवाराने SAI, NS NIS मधून कोचिंग डिप्लोमा किंवा ऑलिम्पिक स्पर्धेत किंवा जागतिकस्तरावरील स्पर्धेत पदकविजेता असावा. पदकविजेता नसल्यास उमेदवार दोनदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी किंवा ऑलिम्पिक किंवा आंतरराष्ट्रीय क्रीडा सामन्यात सहभाग घेतलेला असावा, याशिवाय उमेदवार द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असला तरी तो पात्र ठरेल.

तसेच उमेदवाराला क्रीडा क्षेत्रात किमान 03 ते 15 वर्षांचा अनुभव असावा. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 30 जानेवारी 2024 पर्यंत हाय परफॉर्मन्ससाठी कमाल वयोमर्यादा 60, तर सीनिअर कोचसाठी 50, कोच या पदासाठी 45 वर्षांपर्यंत आणि सहायक कोचपदासाठी 40 वर्षांपर्यंत असावे. यासोबत पात्रतेचे सविस्तर निकष जाणून घेण्यासाठी उमेदवारंनी SAI च्या संकेतस्थळावरील सविस्तर जाहिरात पाहावी.

अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. यासाठी उमेदवाराने स्पोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक पात्रतेची माहिती अचूक आणि पूर्ण भरणे आवश्यक आहे. या भरतीसाठी 15 जानेवारी 2024 पासून अर्ज दाखल करायचा असून, अंतिम मुदत 30 जानेवारी 2024 पर्यंत आहे. या भरतीच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी स्पोर्टस अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा पुढील लिंकवर सविस्तर जाहिरात पाहावी.

जाहिरात लिंक - https://drive.google.com/file/d/1u4pGHwe2GJ8jKPBkzLpxRSJ_108VdvT4/view

(Edited By- Ganesh Thombare)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT