Forest Administration : पेसा क्षेत्र वगळता राज्यातील वनरक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा

Governments Decision : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर शासनाचा मोठा निर्णय
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Chandrapur : महाराष्ट्रात वनरक्षकपदावर भरती व्हावी, यासाठी बराच काळ प्रतीक्षेत असलेल्या युवा उमेदवारांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील 1 हजार 256 वनरक्षकांची पदभरती प्रक्रिया आता लवकरच पूर्ण होणार आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

महाराष्ट्रातील 2 हजार 138 वनरक्षकपदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. वनरक्षकपदांसाठी 2 ते 11 ऑगस्ट 2023 दरम्यान ऑनलाइन परीक्षा टीसीएस-आयओएनमार्फत घेण्यात आली. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) शासकीय पदभरती प्रक्रियेस सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने वन विभागातील संपूर्ण पदभरती रखडली होती. ही भरती केव्हा होणार, याची प्रतीक्षा तरुणांना होती.

Sudhir Mungantiwar
Chandrapur : कर्मचाऱ्याच्या आई-वडिलांसाठी गोंडपिपरीच्या एसडीओने घेतला निर्णय की...

संपूर्ण भरती प्रक्रिया रखडल्याने यासाठी वनमंत्री मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नरत होते. वनमंत्र्यांच्या सततच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे. खोळंबलेल्या पदभरती प्रक्रियेस आता महाराष्ट्र शासनाकडून मान्यता मिळाली आहे. शासनाने अनुसूचित क्षेत्र (पेसा) वगळता उर्वरित 1 हजार 256 वनरक्षकांच्या पदभरती प्रक्रियेला मान्यता प्रदान केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे वनरक्षकपदावर नेमणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सुमारे चार लाख उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या वनरक्षकपदभरती परीक्षेत एकूण 3 लाख 95 हजार 768 परीक्षार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा दिली होती. त्यातील एकूण 2 लाख 71 हजार 838 परीक्षार्थी 45 टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करून पात्र ठरले आहेत.

पुढील भरती प्रक्रियेत टीसीएस-आयओएनकडून प्राप्त गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांची कागदपत्रांची छाननी, शारीरिक गुणवत्ता चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार पाडले जातील. ऑनलाइन परीक्षा आणि प्रत्यक्ष धाव चाचणी यांचे गुण एकत्र करून नवीन गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. नवीन गुणवत्ता यादीनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या यादीला प्रादेशिक निवड समितीकडून मान्यता घेतल्यानंतर अंतिम टप्प्यात निवड सूचीतील उमेदवारांची 25 किलोमीटर आणि 16 किलोमीटर चालण्याची चाचणी होणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अंतिम चाचणीतून पात्र उमेदवार निवडून त्यातून वनरक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. ही प्रक्रिया 17 जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. वनवृत्तातील उमेदवार संख्येनुसार 15 दिवस ते 44 दिवस या कालावधीत ही प्रक्रिया वनवृत्तनिहाय पूर्ण केली जाईल. सर्वात कमी उमेदवार असलेल्या अमरावती वनवृत्तात ही प्रक्रिया 15 दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

सर्वांत जास्त उमेदवार असलेल्या कोल्हापूर वनवृत्तात 44 दिवसांत वनभरती पूर्ण होईल. ठाणे आणि नागपूर वनवृत्तात 40 दिवसांत भरती प्रक्रिया पूर्ण होईल. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नाशिक, पुणे या वनवृत्तात प्रत्येकी 20 दिवसांत वनरक्षक भरती प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. भरती प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यांची माहिती वन विभागाच्या संबंधित संकेतस्थळांवर वेळोवेळी दिली जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या युवा उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited by : Prasannaa Jakate

R...

Sudhir Mungantiwar
Chandrapur Lok Sabha Constituency: किंगमेकर डॉ. अशोक जीवतोडेंना मिळणार का खासदारकीचा राजयोग ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com