FDA Exam Allegations : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत २ उमेदवारांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
यावर्षीच्या २२ मार्च रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाली होती. तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. गुणपत्रिका आणि अंतिम निवड यामध्येही विसंगती असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
या प्रकरणात संबंधित व्हॉट्सअॅप चॅट, कॉल रेकॉर्ड आणि इतर डिजिटल पुरावे यांची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी, तसेच संपूर्ण भरती प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला नाही असं स्पष्ट मत एमपीएससीने दिलं आहे. अन्न व औषध प्रशासनाकडे या आरोपात संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एमपीएससी कडून त्याची पडताळणी केली जाणार आहे.
एमपीएससीचीने सर्व आरोप फेटाळून लावले असून परीक्षा एक महिन्यापूर्वी झाले निकालही लागल्याचे म्हटलं आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल मात्र यात जर तथ्य नसेल तर अफवा पसरवण्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा एमपीएससीने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.