Nandan Nilekani : पेपरफुटी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; नंदन नीलेकणींच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर्ड टास्क फोर्सची स्थापना

NEET Paper Leak : नीट व इतर स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांनंतर केंद्र सरकारने केवळ कायदाच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही मोठी पावले उचलली आहेत. राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेतील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यावर भर दिला जात आहे.
Narendra Modi
Infosys co-founder Nandan Nilekani has been appointed to lead a high-powered task force aimed at strengthening India's public examination system after the NEET paper leak.Sarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi, 27 Jul : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणानंतर देशभरात उसळलेल्या विद्यार्थी आंदोलनाने केंद्र सरकारला मोठा धक्का दिला होता. लाखो विद्यार्थ्यांनी परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या प्रकरणाच्या राजकीय पडसादांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

त्यानंतर परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याच्या दिशेने केंद्र सरकारने निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षांमधील पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार आज (27 जुलै) लोकसभेत सुधारणा विधेयक सादर करणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह दुपारी 12 वाजता हे विधेयक सभागृहात मांडतील.

या विधेयकात पेपरफुटी, प्रश्नपत्रिका लीक करणे, संघटित गैरप्रकार आणि परीक्षा प्रक्रियेत हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. दोषी आढळल्यास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10 कोटींपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. 24 जुलै रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली होती. आता संसदेच्या मंजुरीनंतर हा कायदा अधिक प्रभावी स्वरूपात लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

Narendra Modi
Shrikant Shinde Minister : श्रीकांत शिंदेंना केंद्रात मंत्रीपद! सुनील तटकरेंकडून शिवसेना अन् एकनाथ शिंदेंच्या वाढलेल्या ताकदीची स्तुस्ती

परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल

नीट व इतर स्पर्धा परीक्षांतील गैरप्रकारांनंतर केंद्र सरकारने केवळ कायदाच नव्हे, तर प्रशासकीय पातळीवरही मोठी पावले उचलली आहेत. राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेतील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून, परीक्षा प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यावर भर दिला जात आहे.

Narendra Modi
Maharashtra News Live Update : केंद्र सरकार आज संसदेत सुधारित 'अँटी-पेपर लीक' विधेयक मांडणार

नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली टास्क फोर्स

परीक्षा व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय (हाय पॉवर्ड) टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती तंत्रज्ञानाच्या मदतीने सार्वजनिक परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह कशा बनवता येतील, याबाबत सरकारला शिफारसी करणार आहे.

नीट पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांचा ढासळलेला विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने कायदेशीर तसेच तांत्रिक पातळीवर एकाच वेळी मोठी मोहीम सुरू केल्याचे या निर्णयांवरून स्पष्ट होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com