NCP News : जयंतीदिवशीच अजित पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने बाळासाहेब पिंगळे अडचणीत, कोणत्या मंत्र्याला शरण गेले?

Ajit Pawar Controversy: मविप्र संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार जयंती कार्यक्रम झाला. यावेळी बाळासाहेब पिंगळे यांनी अजित पवार यांच्या विषयी अवमानजनक विधाने केले. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.
Balasaheb Pingale apologises over Ajit Pawar remarks
Balasaheb Pingale apologises over Ajit Pawar remarksSarkarnama
Published on
Updated on

Nashik News, 27 Jul : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवगंत अजित पवार जयंतीचा कार्यक्रम वादात सापडला आहे. सत्ताधारी गटाचे बाळासाहेब पिंगळे यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्या विषयी आपत्ती जनक विधान केले. हा वाद आता चांगलाच चिघळला आहे.

मविप्र संस्थेच्या मखमलाबाद विद्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीच्या कार्यक्रम झाला. यावेळी बाळासाहेब पिंगळे यांनी अजित पवार यांच्या विषयी अवमानजनक विधाने केले. त्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे.

यासंदर्भात सोशल मीडियावर बाळासाहेब पिंगळे यांच्यावर चांगलीच टीका झाली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पिंगळे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पिंगळे यांना धडा शिकवण्याचा इशारा दिला आहे.

Balasaheb Pingale apologises over Ajit Pawar remarks
Nandan Nilekani : पेपरफुटी रोखण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; नंदन नीलेकणींच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर्ड टास्क फोर्सची स्थापना

वाद तापल्याने वादग्रस्त बाळासाहेब पिंगळे यांनी नाशिकच्या एका ज्येष्ठ मंत्र्याच्या फार्मवर शरणागती पत्करली. यावेळी त्यांनी दिलगिरी व्यक्त करत आपण अजित पवार पक्षाचेच असल्याचा दावा केल्याचे कळते. त्यामुळे या वादात थेट मंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागल्याने तो चर्चेचा विषय आहे.

Balasaheb Pingale apologises over Ajit Pawar remarks
Maharashtra News Live Update : अभिजीत दीपकेंचा सरकारला गर्भित इशारा; म्हणाले, '...तर 'सीजेपी' पुन्हा आंदोलन सुरू करेन'

संबंधित ज्येष्ठ मंत्र्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून वाद समजून घेतला. पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. मात्र संतप्त पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे कळते. प्रा. पिंगळे यांच्या विद्येची देवता सरस्वती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी वादग्रस्त विधानाने सत्ताधारी पदाधिकारी ही अडचणीत आले आहेत. हा वाद आता थेट मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी या वादातून आपली सुटका करून घेण्याची धडपड सुरू केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com