MPSC  Sarkarnama
प्रशासन

MPSC News : मोठी बातमी! राज्यसेवेची परीक्षा पुढे ढकलली; आता 'या' दिवशी होणार परीक्षा

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Competitive Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएसी) वर्ग 1 आणि वर्ग 2 प्रवर्गातील एकूण 524 पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ६ जून रोजी होणार होती. आता ती पढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा २१ जुलै २०२४ रोजी होणार असल्याचे एमपीएसीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता त्यांना या परीक्षेसाठी ओबीसी प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता ही परीक्षा २१ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे निवेदन एमपीएसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

राज्यात बदललेल्या आरक्षणानुसार आयोगाने जा. क्र. 414/2023 हे शुद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेचा दिनांक व इतर मागासवर्ग आरक्षणासह अर्ज सादर करण्याबाबतची माहिती देण्यात आली आहे. त्यात ही परीक्षा 21 जुलै रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एमपीएससीने राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेबाबतच्या ८ मे च्या शुद्धिपत्रकात म्हटले,अलिकडच्या काळात काही उमेदवारांना कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे. त्या आधारे त्यांना खुल्या प्रवर्गातून ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी राज्यात ५२४ रिक्त पदांसाठी होणारी परीक्षा पुढे ढकलून ती आता २१ जुलै रोजी होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT