Mumbai News: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना अखेर पदावरून हटवण्यात आलं आहे. आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राधेश्याम मोपलवार यांची 2018 मध्ये निवृत्ती जाहीर झाली होती. मात्र, त्यानंतर मोपलवार यांना तब्बल सात वेळा आपली कालमर्यादा वाढवून मिळाली होती. मोपलवार हे मूळचे नांदेडचे असून, ते 1995 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. राधेश्याम मोपलवार यांची प्रशासकीय सेवा ही एक वादग्रस्त अधिकारी म्हणून चर्चेत राहिली.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामात सुरुवातीपासूनच राधेश्याम मोपलवार यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मोपलवार यांना कायम स्थान मिळत होते.
दरम्यान, मोपलवारांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व कोकण आयुक्त या पदांसह अनेक महत्त्वाची खाती सांभाळली आहेत. मात्र, आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून मोपलवारांना हटवण्यात आलं आहे, तर त्यांच्या जागी अनिल गायकवाडांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.