Cabinet Meeting: शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणार ? मंत्रिमंडळ बैठकीत आठ धडाकेबाज निर्णय

Unseasonal Rain : मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत मोठे निर्णय झाले आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने बुधवारी मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.

याबरोबरच अवकाळीचा फटका बसलेल्या शेतीला आणि दुष्काळी तालुक्यांसाठी 2600 कोटींच्या मदतीची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात राज्य सरकार केंद्र सरकारकडे तसा प्रस्तावदेखील पाठवण्याची शक्यता आहे.

पण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागात आता दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टर मर्यादा ठेवून मदत करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे 'एनडीआरएफ'च्या नियमानुसार मदत दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय झाले ?

  • अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार. (मदत व पुनर्वसन)

  • झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतर शुल्कात 50 टक्के कपात करण्याचा निर्णय. या निर्णयामुळे झोपडीधारकांना दिलासा. (गृहनिर्माण विभाग)

  • राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान, शाळांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय, पहिल्या टप्प्यात 478 शाळांचा समावेश. (शालेय शिक्षण)

  • मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करण्याचा निर्णय. (मराठी भाषा विभाग)

  • मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली.(अल्पसंख्याक विभाग )

  • औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधीशांना सुधारित सेवानिवृत्तिवेतनाचा निर्णय. (उद्योग विभाग )

  • महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करण्याचा निर्णय. (महसूल विभाग)

  • शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग 1 जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा. (महसूल विभाग)

(Edited By - Ganesh Thombare)

Eknath Shinde
Uddhav Thackeray : राजा मस्त अन् प्रजा त्रस्त;...यांना मुख्यमंत्री तरी कसे म्हणायचे?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com