Lokayukta Bill : Mantralay Sarkarnama
प्रशासन

Education Department Theft : शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार लंपास; चौघांवर गुन्हा दाखल !

fake checks by creating fake stamps of the Education Department : शिक्षण विभागाचे बनावट शिक्के तयार करत, बोगस स्वाक्षऱ्या आणि खोट्या चेकच्या मदतीने काढली रक्कम...

Chaitanya Machale

Mumbai News : महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून गेल्या महिन्यात 67 लाख रुपये चोरीला गेल्याची घटना ताजी असतानाच आता शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून 47 लाख 60 हजार रुपये लंपास झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. एका महिन्यातील राज्य सरकारच्या विभागातून रक्कम चोरीला जाण्याची ही दुसरी घटना आहे.

सध्या राज्यात लोकसभा (LokSabha) निवडणुकीचे वातावरण सुरू आहे. राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. राजकीय पक्षांची नेते मंडळी आपल्या उमेदवारांच्या प्रचारात अडकली आहेत. याचा फायदा घेत चोरटे आपले काम दाखवित असल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचे बनावट शिक्के तयार करून तसेच बोगस स्वाक्षऱ्या करून, खोट्या चेकच्या मदतीने ही 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम लंपास केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गेल्या महिन्यात चोरट्यांनी राज्य सरकारच्या पर्यटन विभागाच्या खात्यातून 67 लाख रुपयांवर डल्ला मारल्याचे समोर आले होते. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस (Police) स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेला एक महिना होत नाही तोच शिक्षण विभागाच्या खात्यातून लाखो रुपयांची रक्कम चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एकूण 10 चेकचा वापर करून ही 47 लाख 60 हजार रुपयांची रक्कम काढल्याचे उघड झाले आहे.

चार बँक (Bank) खात्यांमध्ये ही रक्कम जमा झाली आहे. ही सर्व बँक खाती कोलकत्ता येथील असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पुढे आले आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या बँक खात्यामध्ये चोरीची रक्कम जमा झाली आहे. ती खाती नमिता बग, प्रमोद सिंग,तप कुमार, झितन खातून यांच्या नावावर आहेत. या चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सरकारी विभागाच्या खात्यातून अशा प्रकारे चोरी होणे अत्यंत गंभीर प्रकार आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT