Shubham Thite News : जर्मनीतील नोकरी नाकारणारा जमादाराचा मुलगा झाला आयपीएस

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा, जमादाराचा मुलगा झाला आयपीएस. कुठलाही क्लास न लावता पोलिस लाईनमधील शुभम थिटे यांनी मिळवले यश.
Shubhm Thite
Shubhm Thite Sarkarnama

Pimpri News : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेचा निकाल मंगळवारी (ता. 16) लागला. महाराष्ट्रातील 87 जणांसह देशातील 1016 जण त्यात यशस्वी झाले आहेत.त्यामध्ये 359 व्य़ा क्रमाकांने उत्तीर्ण झालेला पिंपरी-चिंचवडकर शुभम भगवान थिटे याचे य़श उल्लेखनीय म्हणावे लागेल. कारण कुठलाही क्लास न लावता त्याने पहिल्याच प्रयत्नात अत्यंत कठीण समजली जाणारी ही परीक्षा क्रॅक केली.

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील केंदूर हे शुभमचे मूळगाव आहे. त्या गावातील दोघे आय़पीएस (IPS) आणि आयआरएस (IRS) अगोदरच झालेले आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे यूपीएससीत (UPSC) रस असल्याने शुभमने जर्मनीत नोकरी करण्याची आलेली संधी घेतली नाही. त्याचे वडिल भगवान थिटे हे पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष शाखेत सहाय्यक फौजदार म्हणजे जमादार आहेत.

Shubhm Thite
Ram Satpute Property : 'ऊसतोड कामगाराचा मुलगा' म्हणवून घेणाऱ्या आमदार राम सातपुतेंची संपत्ती किती?

ते वाकड पोलिस वसाहतीत राहतात. तेथील लायब्ररीतच दररोज दहा तास अभ्यास करीत त्यांच्या मुलाने शुभमने हे घवघवीत यश संपादन केले. त्यामुळे शहर पोलिस दलातून या बापेलेकांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरु आहे.

आपल्या मुलाच्या या यशाबद्दल एएसआय भगवान थिटे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना आनंद व्यक्त केला. त्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घालून दिल्या,असे त्यांनी मुलाच्या पूर्वतयारीची पूर्वपिठीका सांगितली. तर,साडेसतराशे मार्काच्या या परिक्षेतील फक्त पाचशे गुणांसाठीच शुभमे ऑनलाईन क्लासची मदत घेतली.

वडिल पोलिस खात्यात असल्याने लहानपणापासून आय़पीएसचे आकर्षण होते, असे तो म्हणाला. पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिका आय़ुक्त असताना श्रीकर परदेशी यांनी अत्यंत चांगले काम केले. असेच काम आपणही करू शकतो, असे ठरवून ही यूपीएससीची नागरी परीक्षा देण्याचा निश्चय केला, असे त्याने सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुभमचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी इंग्लिश मिडीयममध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये झाले आहे. बारावीपर्यंत तो पुण्यात होता. त्यानंतर त्याने मेकॅनिकल इंजिनिअरची पदवी पहिल्या श्रेणीत घेतली. त्यामुळे त्याला जर्मनीत नोकरीची संधी लगेच चालून आली. मात्र, युपीएससी परिक्षेत इंटरेस्ट असल्याने सिलेक्शन होऊनही तो जर्मनीला गेला नाही. यूपीएससीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनी प्रथम चांगल्या मार्काने पदवी परीक्षा उत्तीर्ण होण्याचा सल्ला त्याने दिला आहे. तसेच युपीएससीच्या तयारीसाठी माहिती चांगली काढा, असेही त्याचे म्हणणे आहे.

शुभमची आई गृहिणी आणि बहिण स्नेहल आयटी इंजिनीअर आहेत. त्याचे आजोबा, पणजोबा हे शिक्षक होते. चुलते, चुलती शिक्षकच आहेत. एकूणच या शिक्षकी पेशाच्या वातावारणामुळे शुभमची शैक्षणिक गुणवत्ता ही चांगली राहिली. परिणामी दहावी म्हणजे एसएससीत त्याने 94 टक्के, तर बारावीला 82 टक्के मार्क मिळविले. इंजिनिअरींगची पदवीही तो पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाला आणि आता यूपीएससीही पहिल्याच प्रयत्नात पास झाला.

Shubhm Thite
Rubal Agrawal : मुंबई मेट्रोचे ‘कंट्रोल’ आता IAS रुबल अग्रवाल यांच्या हाती !

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com