Lok Sabha News 2024 : गुन्हेगार उमेदवार दिल्यास राजकीय पक्षांना स्पष्टीकरण देणे बंधनकारक !

Ahmednagar Lok Sabha Constituency : उमेदवाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा सर्व तपशील ग्रामपंचायत ठिकाणी प्रसिद्ध करावा लागणार..
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Lok Sabha 2024 : निवडणूक आयोगाने उमेदवाराच्या गुन्ह्याविषयींची माहिती प्रसिद्ध करण्याच्या तपशीलविषयी नियम अधिक कडक केले आहेत. गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला उमेदवारी का दिली, याचे पक्षाला स्पष्टीकरण आणि उमेदवाराविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची आणि मालमत्ता याचा सर्व तपशील ग्रामपंचायत ठिकाणी प्रसिद्ध करावा लागणार आहे. नगर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी ही माहिती दिली.

उमेदवारांची गुन्हेगारीची पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग संवेदनशील आहे. गुन्हेगार उमेदवाराला उमेदवारी का दिली, याचे स्पष्टीकरण पक्षाला त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावे लागणार आहे. उमेदवाराला त्याची उमेदवारी मागे घेण्याच्या दिनांकापासून ते मतदानाच्या दोन दिवसअगोदरपर्यंत ही माहिती द्यावी लागणार आहे.

तसेच उमेदवारावर दाखल गुन्ह्यांची माहिती तसेच मालमत्तेचा तपशील ग्रामपंचायत पातळीवर प्रसिद्ध करावा लागणार आहे. याशिवाय उमेदवारावर गुन्ह्यांची माहिती टीव्ही, वृत्तपत्रातून तीन वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध द्यावी लागणार आहे. गुन्हेगारीविषयक माहिती प्रसिद्ध न केल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कारवाई होणार असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Election Commission
Sharad Pawar News : शरद पवार यांचा मुक्काम विखेंची झोप उडवणार ..!

निवडणूक खर्चासाठी उमेदवाराला अर्ज दाखल करण्याच्या किमान एक दिवस अगोदर स्वतंत्र बँक खाते काढावे लागणार आहे. त्यामध्ये निवडणूकव्यतिरिक्त इतर कोणताही व्यवहार होणार नाही, याची दक्षता घ्यायची आहे, अशी सूचना जिल्हाधिकारी (collector) सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरीक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर उपस्थित होते.

89 जणांचे शस्त्र परवाना रद्द

नगर जिल्ह्यात 3 हजार 148 शस्त्र परवानाधारक आहेत. यातील 89 परवाने रद्द करण्यात आले आहे. यात राजकीय नेत्यांचादेखील समावेश आहे. 95 जणांना विविध कारणांमधून शस्त्र परवाना जमा करण्यापासून वगळले आहे. तर 2099 जणांनी शस्त्र जमा केल्याची माहिती पोलिस अधीक्षक (superintendent of police) राकेश ओला यांनी दिली.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात मोहीम उघडली आहे.यात 21 गावठी पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. दारूबंदीच्या 2 हजार 157 गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात 1 कोटी 92 लाखाचे देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आल्याचेही राकेश ओला यांनी सांगितले.

Election Commission
Harishchandra Chavan: पाच वर्षांत आज माझी आठवण आली का? दिंडोरीत आजी-माजी खासदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप

60 लाखांचे अमली पदार्थ जप्त

निवडणूक आयोगाने (ECI) निवडणूक स्वच्छ आणि शांततेच्या वातावरणात व्हावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहे. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांविरोधात नगर पोलिस अॅक्शन मोडवर कारवाई करत आहेत. पैसा, मसल पॉवर आणि चुकीची माहिती प्रसारित करणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी नगर पोलिस सदैव तत्पर आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत नगर जिल्ह्यात 10 हजार 527 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.71 जणांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

सात जणांविरोधात एमपीडीए अन्वये कारवाई करण्यात आली आहे. पाहिजे असलेले 271 आणि फरार असलेले 23 जणांना पकडण्यात आले आहे. आतापर्यंत 60 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती राकेश ओला यांनी दिली.

Edited By : Chaitanya Machale

  • R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com