NABARD JOB Sarkarnama
प्रशासन

NABARD Recruitment 2025 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 3 लाख रुपये महिन्याला पगार; असा करा अर्ज

NABARD recruitment Government job in Maharashtra : तीन प्रकारच्या पदांसाठी एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून मुंबईतील मुख्यालयात नियुक्ती केली जाईल.

Rashmi Mane

सरकारी नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रिकल्चर अ‍ॅण्ड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) यांनी 2025 साली स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याअंतर्गत तीन प्रकारच्या पदांसाठी एकूण 6 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असून मुंबईतील मुख्यालयात नियुक्ती केली जाईल.

पदांची माहिती

In Charge – Survey Cell – 1 पद
Senior Statistical Analyst – 1 पद
Statistical Analyst – 4 पद

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एम.ए. किंवा एम.एससी. (सांख्यिकी) या शाखेतील पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय संबंधित क्षेत्रातील किमान 1 ते 10 वर्षांपर्यंतचा अनुभव अपेक्षित आहे. अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना जरूर वाचावी.

वयोमर्यादा

In Charge – Survey Cell: 38 ते 55 वर्षे
Senior Statistical Analyst: 30 ते 45 वर्षे
Statistical Analyst: 24 ते 30 वर्षे

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 16 मे 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 1 जून 2025

अर्ज प्रक्रिया

पात्र उमेदवारांनी नाबार्डच्या अधिकृत वेबसाइटवर (http://www.nabard.org) जाऊन ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि अधिसूचना पूर्ण वाचूनच अर्ज सादर करावा.

अर्ज शुल्क

SC/ST/PwBD प्रवर्ग: ₹150

सामान्य व इतर सर्व प्रवर्ग: ₹850

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी केवळ मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

पगार

In Charge – Survey Cell: 3,00,000 प्रतिमाह
Senior Statistical Analyst: 2,00,000 प्रतिमाह
Statistical Analyst: 1,25,000 प्रतिमाह

उमेदवारांसाठी

अर्ज करण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता त्वरित अर्ज करावा. अर्जामध्ये चूक झाल्यास तो नाकारला जाऊ शकतो, त्यामुळे अर्ज भरताना सर्व तपशील नीट तपासावा.

संपर्क व अधिक माहिती:
अधिकृत संकेतस्थळ: www.nabard.org

SCROLL FOR NEXT