CBI action in Nashik  Sarkarnama
प्रशासन

Nashik Bribe Crime: 'सीबीआय'ची मोठी कारवाई; भविष्य निर्वाह निधी आयुक्तांसह दोघांना अटक

संपत देवगिरे

Nashik News: औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या प्रकरणात मध्यस्थांमार्फत लाच घेण्याचे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होते. अखेर यामध्ये कारवाई झाली. ती देखील थेट ‘सीबीआय’कडून. यामध्ये दोन मोठे मासे अडकल्याने इतरांचीही नावे पुढे येतील काय, याची चर्चा आहे.

भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाचे प्रादेशिक आयुक्त गणेश आरोटे यांना अंमलबजावणी अधिकारी अजय आहुजा आणि खासगी पीएफ एजंट बी.एस.मंगलकर यांच्यावर ‘सीबीआय’ने कारवाई केली आहे. या संशयितांकडून सातत्याने तक्रारदारांना त्रास दिला जात होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तिघा संशयितांविरुद्ध ‘सीबीआय’कडे तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराच्या फर्मशी निगडित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी आरोटे यांनी केली होती. ही मागणी खासगी पीएफ एजंटच्या माध्यमातून करण्यात आली.

याबाबत तक्रारदाराने विविध प्रकारे कार्यालयात प्रशासकीय पुर्तता करून देखील त्यांच्या प्रकरणात त्रुटी असल्याचे सांगून थेट पैसे मागितल्याचा प्रकार घडला. त्यानंतर तक्रारदाराने ‘सीबीआय’कडे तक्रार नोंदविली. त्यानुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

सीबीआय’ने झडतीसत्र राबविले असता त्यात अर्थपूर्ण व्यवहाराशी निगडित तपशील असलेली डायरी जप्त केली. येत्या 1 जानेवारीपर्यंत ‘सीबीआय’ कोठडी सुनावण्यात आली आहे. ‘सीबीआय’चे डीआयजी डॉ.सदानंद दाते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रणजित पांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तक्रारदाराच्या कंपनीच्या ‘पीएफ’ प्रकरणाचा निपटारा करून देण्यासाठी दोन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या भविष्यनिर्वाह निधी आयुक्तासह इतर दोन जणांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT