IPS Officers Transfers : राज्यात आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे शहरला मिळाले सहायक पोलिस आयुक्त

Faizpur, Nanded City, Nagpur Rural : फैजपूर, नांदेड शहर, नागपूर ग्रामीणला नवीन अधिकारी मिळाले आहेत
IPS Officers Transfers
IPS Officers Transferssarkarnama
Published on
Updated on

Police News : राज्य सरकारच्या गृहविभागाकडून काढण्यात आलेल्या आदेशामध्ये आयपीएस दर्जाच्या उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यात करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमुळे फैजपूर, नांदेड शहर, नागपूर ग्रामीणला नवीन अधिकारी मिळाले आहेत. तर, पुणे शहराला नवे सहायक पोलिस आयुक्त मिळाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील चोपडाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांची जळगाव जिल्ह्यातच फैजपूर उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. तर, नांदेड शहर पोलिस दलात कार्यरत असलेले उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल म्हस्के यांची नागपूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

IPS Officers Transfers
Praniti Shinde : "सत्तेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठलंही कांड करतील..."

अकलूज सोलापूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कृतिका सी. एम यांची बदली नांदेड पोलिस शहर दलात उपविभागीय पोलिस अधिकारी पदावर करण्यात आली आहे.

आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्यसेवेतील सावनेर, नागपूर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय सुभाष चांदखेडे यांची यांची पुणे शहर पोलिस दलात सहायक पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. तर, फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल शंकर सोनावणे यांची चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून बदली झाली आहे.

(Edited By Roshan More)

IPS Officers Transfers
Maratha Reservation : आता कुठलाही प्रयोग करू नका; जरांगेंचा राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com