Param Bir Singh, former Mumbai Police Commissioner and Executive Director of Lilavati Hospital, dismissed amid ₹25 lakh bribery allegations. Sarkarnama
प्रशासन

Param Bir Singh Dismissed : डॉक्टरांकडून बढतीसाठी मागितले 25 लाख, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची लीलावती रुग्णालयाने केली उचलबांगडी

Lilavati Hospital controversy : पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर परमबीर सिंग यांची जुलै 2024 मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयात अनेक मोठे वाद झाले होते.

Jagdish Patil

Mumbai News, 10 Feb : मुंबईचे वादग्रस्त माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना लीलावती रुग्णालयाने बडतर्फ केलं आहे. डॉक्टरांकडून बढतीसाठी २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली सिंग यांना बडतर्फ करण्यात आलं आहे.

वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञांनीच त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचा पर्दाफाश केल्याचं समोर आलं आहे. परमबीर सिंग यांनी लीलावती रुग्णालयाच्या माजी विश्वस्तांविरोधात कथित 1200 कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार दाखल केली होती.

त्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून बढतीसाठी २५ लाखांची मागणी केल्याच्या आरोपाखाली बडतर्फ करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर परमबीर सिंग यांची जुलै 2024 मध्ये लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून रुग्णालयात अनेक मोठे वाद झाले होते.

त्यांनी रुग्णालयातील माजी विश्वस्तांनी केलेला घोटाळा उघड केल्याचा दावा केला होता. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. यानंतर लगेचच त्यांची तडकाफडकी कार्यकारी संचालकपदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे.

अशातच सिंग यांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे त्यांच्या पदोन्नतीसाठी प्रत्येकी 25 लाख खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करत त्यांना रुग्णालयाने बडतर्फ केलं आहे. तसंच सिंग यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत डॉक्टरांवर कोऱ्या कागदावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करत लीलावती रुग्णालयाच्या विश्वस्तांनी परमबीर सिंग यांनी रुग्णालयात अंतर्गत अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा दावाही केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT