Parbhani District Bank: Sarkarnama
प्रशासन

Parbhani News: सत्ताधारी दोन आमदारांना सहकार खात्याचा दणका; थकबाकी असल्यानं गमावलं संचालकत्व..

प्रसाद जोशी - Guest Sarkarnama

Parbhani: राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार बाबाजानी दुर्राणी ,हिंगोलीचे भाजप आमदार तानाजीराव मुटकुळे यांना विभागीय सहनिबंधकांनी दणका दिला आहे. परभणी जिल्हा बँकेचे त्यांचे संचालकत्व रद्द केले आहे. दोन्ही आमदारांची थकबाकी असल्याने बँकेने ही कारवाई केली आहे.

आमदार बाबाजानी दुर्राणी, तानाजीराव मुटकुळे यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालकत्व विभागीय विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी रद्द केल्याचा आदेश दिला. दुर्राणी, मुटकुळे या दोन्ही आमदारांच्या संबंधित सहकारी संस्थेवर जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकबाकी असल्याने त्यांचे संचालकत्व रद्द केले गेले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत या दोघा आमदारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी त्यांच्यावर बँकेची मोठी थकबाकी होती. सहकारी संस्थेवरील थकबाकी असताना सुद्धा या दोघांनी माहिती लपवली व निवडणूक रिंगणातून संचालकत्व मिळवले.

बँकेचे माजी संचालक तथा दुर्राणी यांचे प्रतिस्पर्धी अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार यांनी सहकार खात्याकडे याबाबत तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची सहकार खात्याने गांभीर्याने दखल घेतली. पाठोपाठ सुनावणी अखेर बँकेचे या दोघांचे संचालकत्व विभागीय सहनिबंधक गुट्टे यांनी काल (सोमवारी) सकाळी रद्द केले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT