Kolhapur News, 1 August : सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून ओळख आणि नंतर त्याचे प्रेमात किंवा मैत्रीत रुपांतर झाल्याचे आणि या माध्यमातून अनेक नातेसंबंध जुळल्याचे आपण पाहिले आहे. शिवाय या माध्यमाचा गैरफायदा घेणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी पोलिस सायबर क्राईम कायद्यांतर्गत कारवाई करतात.
मात्र, कोल्हापुरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ज्यामध्ये पोलिस कॉन्स्टेबलनेच ऑनलाइन प्रेमात पडलेल्या महिल्याच्या घरात धिंगाणा जाऊन घातल्याची माहिती समोर आली आहे.
फेसबुकवर (Facebook) ओळख झालेल्या महिलेच्या घरात घुसून तिला आपल्याशी मैत्री करण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या पोलिसाविरोधात जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज दाखल झाला आहे. अझरुद्दीन खतिफ (रा. हेर्ले, ता. हातकणंगले) असे या आरोपी पोलिसाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पीडित महिलेच्या घरात हा पोलिस (Police) गेला होता. यावेळी त्याने महिलेला मैत्री करण्यासाठी जबरदस्ती केली. यानंतर संबंधित महिलेने जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला.
अझरुद्दीन खतिफ याची पीडित महिलेबरोबर काही दिवसांपूर्वी फेसबुकवर ओळख झाली होती. या ओळखीतून अझरुद्दीनने महिलेला जबरदस्ती मैत्री करण्यासाठीचा तगादा लावला होता. अखेर मैत्रीसाठी करण्यासाठी महिलेवर जबरदस्ती करणाऱ्यासाठी अझरुद्दीनने संबंधित महिलेचं घर गाठलं आणि घरात घुसून धिंगाणा घातला.
यावेळी त्यांने संबंधित महिलेला आणि तिच्या कुटुंबीयांना शिवीगाळ केली. तसंच तिच्या मुलांना आणि आईला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या महिलेने शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. मात्र, कारवाई न झाल्याने तिने बुधवारी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे निवेदन दिले आहे.
या घटनेची तक्रार पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे करण्यात आली आहे. या तक्रार अर्जात पोलिस असणाऱ्या अझरुद्दीन खतिफकडून मला आणि माझ्या कुटुंबीयांना धोका असल्याचं महिलेने म्हटलं आहे. सध्या खतिफ हा कोल्हापूर (Kolhapur) शहराच्या बाहेर असणाऱ्या गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.