Supreme Court : मुख्यमंत्री कार्यालयात अशा गुंडांची गरज आहे का? सुप्रीम कोर्ट संतापले...

Delhi CM Arvind Kejriwal Bibhav Kumar : बिभव कुमार यांच्या जामीनावरील सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री कार्यालयात घडलेल्या घटनेवर नाराजी व्यक्त केली.
Supreme Court
Supreme CourtSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : दिल्लीच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी खासगी सचिव बिभव कुमार यांच्यावरून सुप्रीम कोर्ट गुरूवारी चांगलेच संतापले. आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री कार्यालयात मारहाणप्रकरणी बिभव कुमार जेलमध्ये आहेत. त्यांच्या जामीनावरील सुनावणीदरम्यान कोर्टाने गंभीर सवाल उपस्थित केले.

सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुर्य कांत दीपांकर दत्ता आणि उज्जल भूयान यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी सुनावणी झाली. कुमार यांना दिल्ली हायकोर्टाने नुकताच जामीन नाकारला आहे. तर मे महिन्यात दिल्लीतील स्थानिक कोर्टानेही जामीन नाकारला होता. सुप्रीम कोर्टाने दिल्ली पोलिसांना नोटीस जारी केली असून याबाबत आरोपपत्र सादर करण्यास सांगितले आहे.

Supreme Court
Video Supreme Court : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय! अनुसूचित जाती-जमातीतील आरक्षणाचे वर्गीकरण होणार

सुनावणीदरम्यान कोर्ट म्हणाले, मुख्यमंत्र्यांचा बंगला खासगी निवास आहे का? त्यांच्या कार्यालयात असे गुंड ठेवण्याची गरज आहे? आम्हाला धक्का बसला आहे. हे झाले कसा, असा प्रश्न पडलाय, अशा शब्दांत कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

स्वाती मालीवाल या महिला आहेत. बिभव कुमार यांना हे करताना लाज वाटली नाही का, अशा शब्दांत कोर्टाने बिभव कुमार यांना खडसावले. तुम्ही माजी सचिव होता. जर पीडितेला तिथे थांबण्याचा अधिकार नाही, तर तुम्हालाही तो अधिकार नाही, असे कोर्टाने सुनावले.

Supreme Court
US Election 2024 : भारतीय असल्याच्या सांगणाऱ्या कमला हॅरिस अचानक..! ट्रम्प यांचा हल्लाबोल

काय आहे प्रकरण?

स्वाती मालीवाल या केजरीवाल यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना भेटण्यासाठी 13 मे रोजी गेल्या होत्या. यादिवशी बिभव कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत केली. त्यानुसार कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. बिभव कुमार यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

या घटनेनंतर मालीवाल यांच्याकडून उघडपणे केजरीवाल यांच्यासह आपमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. केजरीवाल यांच्यासह आपमधील बहुतेक नेते बिभव कुमार यांच्या बाजूने बोलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर ऐन लोकसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com