CP Amitesh kumar Sarkarnama
प्रशासन

Pune Police Transfer : देवेंद्र फडणवीसांच्या कानपिचक्या की Porsche Effect; Pune CP का चिडले ?

Pune CP Amitesh Kumar : शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Sunil Balasaheb Dhumal

Pune Police News : पुणे पोलिस प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कल्याणीनगर येथील झालेल्या पोर्श कार अपघातात पोलिसांवर गंभीर आरोप झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी शहरातील तब्बल 21 पोलिस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यांचे आदेश काढला आहे. त्यामुळे हा इफेक्ट अपघाताचा आहे की गृहमंत्री देवेंद्र फडणविसांनी घेतलेल्या कानपिचक्यांचा परिणाम, अशा चर्चांना उधाण आले आहे.

शहर पोलिस दलातील सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचा आदेश गुरुवारी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. बदल्या करण्यात आलेल्यांमध्ये पाच सहायक पोलिस आयुक्त, पाच वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नऊ पोलिस निरीक्षक आणि दोन उपनिरीक्षक यांचा समावेश आहे.

पुणे पोलिसांत झालेल्या बदल्या..

सहायक पोलिस आयुक्त (कार्यरत विभाग ते बदलीचा विभाग)

1. विठ्ठल दिगंबर दबडे - सपोआ विशेष शाखा १ ते सपोआ येरवडा विभाग

2. मच्छिंद्र रामचंद्र खाडे - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ फरासखाना विभाग

3. जगदीश दत्तात्रेय सातव - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ सिंहगड रोड विभाग

4. रंगनाथ बापू उंडे - सपोआ आस्थापना ते सपोआ कोथरूड विभाग

5. व्यंकटेश श्रीकृष्ण देशपांडे - सपोआ वाहतूक शाखा ते सपोआ अभियान

वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक (कार्यरत ठिकाण ते बदलीचा विभाग)

1. संतोष उत्तमराव पाटील - येरवडा पोलिस ठाणे ते विशेष शाखा

2. मनीषा हेमंत पाटील - चंदननगर पोलिस ठाणे ते विशेष शाखा

3. कैलास शंकर करे - लोणीकंद पोलिस ठाणे ते आर्थिक गुन्हे शाखा

4. विपिन व्यंकटेश हसबनीस - डेक्कन पोलिस ठाणे ते पोलिस निरीक्षक कल्याण

5. युसूफ नबिसाब शेख - उत्तम नगर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष

6. मीनल विलास सुपे-पाटील - सायबर पोलिस ठाणे ते वाहतूक शाखा

7. गणेश रंगनाथ उगले - पोलिस निरीक्षक कल्याण ते नियंत्रण कक्ष

8. अर्जुन गोविंद बोत्रे - वाहतूक शाखा ते विशेष शाखा

9. सीमा सुधीरकुमार ढाकणे - लोणीकंद पोलिस ठाणे ते विशेष शाखा

10. रवींद्र धैर्यशील शेळके - आर्थिक गुन्हे शाखा ते येरवडा पोलिस ठाणे

11. संजय गुंडाप्पा चव्हाण - आर्थिक गुन्हे शाखा ते चंदननगर पोलिस ठाणे

12. सावळाराम पुरुषोत्तम साळगावकर - विशेष शाखा ते लोणीकंद पोलिस ठाणे

13. स्वप्नाली चंद्रकांत शिंदे - नियंत्रण कक्ष ते डेक्कन पोलिस ठाणे

14. मोहन कृष्णा खंदारे - विश्रांतवाडी पोलिस ठाणे ते उत्तमनगर पोलिस ठाणे

पोलिस उपनिरीक्षक (कार्यरत ठाणे ते बदलीचा विभाग)

1. संतोष केशव सोनवणे - वानवडी पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष

2. किरण उत्तम धायगुडे - लोणी काळभोर पोलिस ठाणे ते नियंत्रण कक्ष

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT