Shankar jagtap : Devendra Fadnavis
Shankar jagtap : Devendra FadnavisSarkarnama

Pimpri Chinchwad BJP City President: फडणवीसांनी तो शब्द पाळला अन् पाच महिन्यातच तो खराही केला!

Shankar Jagtap BJP City President: शंकर जगताप यांची आज भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली.
Published on

Pimpri-Chinchwad News: अडीच महिने खोळंबलेली भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्षपदाची निवड अखेर आज (ता.१९) झाली. पक्षाचे प्रदेश निमंत्रित सदस्य शंकर जगताप (Shankar Jagtap) यांची भोसरीचे आमदार महेश लांडगेच्या (Mahesh Landage) जागी शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकी दरम्यान दिलेला शब्द खरा करून दाखवला.

लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे यावर्षी ३ जानेवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर १५ दिवसांतच तेथे पोटनिवडणूक लागली. त्यावेळी उमेदवार म्हणून शंकर जगतापांचे नाव पुढे येताच त्याला पक्षातूनच आणि चिंचवड विधानसभेतील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनीच पहिला विरोध केला होता. त्यामुळे लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी नंतर जाहीर झाली. पण, त्यासाठी त्यावेळी उमेदवारीसाठी तीव्र इच्छूक असलेले शंकर जगताप यांची समजूत पक्षाला काढावी लागली होती. खुद्द फडणवीस यांनी त्यांना टर्म संपलेल्या शहर अध्यक्षपदी संधी देण्याचा शब्द दिला होता.तो त्यांनी आता खरा करून दाखवला आहे.

Shankar jagtap : Devendra Fadnavis
BJP District President Appointment : शहराध्यक्ष निवडीवरून भाजपमध्ये दुफळी; शंकर जगतापांच्या निवडीला विरोध

शंकर जगताप यांची आज भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यावर पक्षाने दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवू,अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी `सरकारनामा`ला दिली. सर्वांना बरोबर घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेत शंभर टक्के पुन्हा सत्ता आणू,असा निर्धारही जगताप यांनी बोलून दाखवला.

दरम्यान, शंकर जगताप यांच्या नावाला अगोदरच चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत झालेला विरोध लक्षात घेता आताही पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदासाठी तो होईल, अशी शक्यता भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी विचारात घेतली होती. तरीही त्यांनी ही नियुक्ती केली, त्यामागे पिंपरी महापालिकेच्या निवडणुकीचे गणित आहे.

शंकर जगतापांच्या नेमणुकीला विरोध करणारे मातब्बर नाहीत. त्यांच्याकडे मावळते अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे आणि नवनियुक्त अध्यक्ष शंकर जगताप यांच्यासारखी प्रबळ मनी आणि मसल पॉवर नाही. तेच मुख्य आणि मोठे भांडवल आगामी महापालिका निवडणुकीत ठरणार आहे. त्यामुळे श्रीमंत पिंपरी महापालिका ताब्यात ठेवण्यासाठी भाजपने जगतापांच्या नियुक्तीची खेळी विरोध डावलून केली आहे.

Shankar jagtap : Devendra Fadnavis
Ahmednagar BJP City President: भाजपने बदलले तीनही जिल्हाध्यक्ष; आगरकर, भालसिंग, लंघे यांची वर्णी!

तसेच पिंपरीतील सत्ता कायम राहण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्याकडूनही त्यांनी शब्द घेतला असल्याचे पक्षातील जबाबदार पदाधिकाऱ्याने सांगितले. दुसरीकडे अध्यक्षानंतर दुसऱ्या क्रमाकांचं मोठं पद असलेले शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात यांनी जगतापांच्या निवडीला तीव्र आक्षेपच घेतलेला नाही, तर कडाडून विरोधही केलेला आहे. त्यानंतर या विरोधाला आणखी साथ मिळून, तो अधिक धारदार होण्याची शक्यताही आहे.

थोरातांचा हा विरोध शंकर जगताप कसा मोडून काढणार आणि थोरांताची कशी समजूत काढणार किंवा पक्षशिस्त भंग केला म्हणून थोरातांवरच भाजप कारवाई करणार का? याकडे आता उद्योगनगरीचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com