pune traffic.jpg Sarkarnama
प्रशासन

Pune News: पुणेकरांसाठी सर्वात मोठी बातमी: बकरी ईदनिमित्त वाहतुकीत महत्त्वाचे बदल, 'हे' प्रमुख रस्ते असणार बंद

Pune Traffic News : पुणे शहरातील काही मुख्य रस्ते सकाळी सहा वाजण्यापासून ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

Deepak Kulkarni

Pune News : पुणे शहरातील वाहुतककोंडी नेहमीच डोकेदुखीचा विषय ठरत असतो. आता याचदरम्यान,पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद या सणानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पुण्यातील गोळीबार मैदान परिसरात असणाऱ्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केले जाणार आहे. त्यामुळे पुणे (Pune) शहरातील वाहतुकीत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील काही मुख्य रस्ते सकाळी सहा वाजण्यापासून ते नमाज पठण पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांनी गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलं आहे.

पुण्यात बकरी ईदमुळे प्रमुख रस्त्यावरील वाहतुक (Traffic) वळविण्यात आली आहे. सेवन लव्ह चौक आणि गोळीबार मैदान भागात प्रवास करताना शक्यतो पर्यायी मार्ग वापरण्यात आले तर मानसिक त्रास कमी सहन करावा लागण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएल बस,मालवाहू गाड्या यांसह इतर जड वाहनांनासाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे.

लुल्लानगर चौकातून गोळीबार मैदानाकडे जाण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी पूर्णत:बंदी असणार आहे. त्यांना लुल्लानगर चौकातून भैरोबा चौक किंवा गंगाधाम मार्गे पुढे जाता येणार आहे. त्याचवेळी भैरोबा चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारी वाहतूक सकाळी ६ पासून बंद असणार आहे.

यावेळी पुणे पोलिसांनी पर्यायी मार्ग म्हणून स्वारगेटकडे जाण्यासाठी प्रिन्स ऑफ वेल्स रोड-लुल्लानगर चौक मार्गे तर पुणे रेल्वे स्टेशनला जाण्यासाठी इम्प्रेस गार्डन रोडचा वापर करण्याची माहिती दिली आहे.

जुनी सोलापूर रस्ता चौकी चौक ते गोळीबार मैदान हा रस्ता बंद राहणार असून खाणे मारुती चौकाकडून येणारी वाहतूक पूलगेट डेपो - सोलापूर बाजार चौक - खटाव बंगला मार्गे या पर्यायी मार्गांचा असणार आहे.

मम्मादेवी चौकातून गोळीबार मैदानाकडे जाणारा रस्ता बंद राहणार असल्यामुळे त्या परिसरातून बिशप स्कूल किंवा कमांड हॉस्पिटलच्या जवळून तुम्हाला तुमच्या नियोजित स्थळी पोहचता येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT