Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना गुप्तचर विभागात नोकरी करण्याची संधी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने गुप्तचर विभागामध्ये विविध तांत्रिक पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती जाणून घ्या.
भारत सरकारच्या गृहमंत्रालयाच्यावतीने इंटेलिजन्स ब्युरो (IB) विभागामध्ये ‘असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर या ग्रेड-II पदासाठी भरती करण्यात येत आहे. या पदासाठी एकूण 226 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. ही पदभरती उमेदवाराच्या GATE स्कोअरच्या आधारावर केली जाणार आहे. या पदासाठी वेतनश्रेणी ही 44,900 – 1,42,000 आहे.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर उमेदवारांची पात्रता (GATE स्कोअरनुसार) तपासून मुलाखतीसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी उमेदवाराचे इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन किंवा कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातील 2021, 2022 किंवा 2023 या वर्षातील व्हॅलिड GATE स्कोअर विचारात घेतला जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तसेच बी. ई. / बी. टेक. (ENTC, CSE) किंवा एम. एस्सी. (इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स) पदवी प्राप्त झालेली असावी. GATE स्कोअर 1000 असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी निवडले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती घेण्यासाटी उमेदवारांनी www.ncs.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
या पदभरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा असून उमेदवारांनी गृह विभागाच्या www.ncs.gov.in किंवा www.mha.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज करण्याची अंतिम मुदत 12 जानेवारी 2024 आहे. तसेच या भरतीसाठी उमेदवाराची वय 12 जानेवारी 2024 पर्यंत 18 ते 27 वर्षे असावे.
या अर्जासाठी उमेदवाराकडून 100 रुपये शु्ल्क आकारले जाणार आहे. उमेदवारांनी ते SBI बँकेत चलनाच्या माध्यमातून भरणा करणे आवश्यक आहे. याबाबतच्या अधिकच्या तपशिलासाठी उमेदवारांनी गृह विभागाच्या www.mha.gov.in संकेतस्थळावर भेट देऊन सविस्तर जाहिरात पाहावी.
(Edited by Amol Sutar)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.