Udayanraje Bhosale News : नारायण राणेंचा उदयनराजेंना शब्द; साताऱ्यात होणार टेक्नॉलॉजी सेंटर

Narayan Rane साताऱ्यातील नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरबाबत खासदार उदयनराजे भोसले यांनी आज नवी दिल्लीत उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली.
Narayan Rane, Udayanraje Bhosale
Narayan Rane, Udayanraje Bhosalesarkarnama
Published on
Updated on

Udayanraje Bhosale News : सातारा येथील नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरसाठी आठ दिवसांत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रस्तावास तत्काळ मान्यता देण्यात येईल, असे आश्वासन मंत्री राणे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिले आहे.

साताऱ्यातील नियोजित टेक्नॉलॉजी सेंटरबाबत खासदार उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी आज नवी दिल्लीत केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे Narayan Rane यांची भेट घेतली.

यावेळी सातारा जिल्ह्यात टेक्नॉलॉजी सेंटर स्थापन केल्यास ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा, विजेवर चालणाऱ्या वाहनांचे उद्योग, कृषीऔजारे उद्योग, कागद उद्योग आदी उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ तयार होणार आहे. केवळ सातारा जिल्हाच नव्हे तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच उद्योगांना त्याचा लाभ होणार आहे.

त्यामुळे हे सेंटर लवकरात लवकर मंजूर करावे, अशी मागणी उदयनराजे यांनी केली. यावर मंत्री राणे यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून सूचना केल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून येत्या आठ दिवसांत प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्याच्या सूचना केल्या. केंद्र स्तरावरच या टेक्नॉलॉजी केंद्राला तातडीने मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन राणे यांनी दिले.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Narayan Rane, Udayanraje Bhosale
Satara NCP News : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा भलताच उत्साह; नेत्याच्या मंत्रिपदासाठी घातले दगडूशेठ गणपतीला साकडे...

‘मास’ला दिल्या शुभेच्छा

मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ सातारा यांच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर सुरू असलेल्या औद्योगिक प्रदर्शनास खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. टेक्नॉलॉजी सेंटरबरोबरच साताऱ्यात ईएसआय रुग्णालय आणि ईपीएफ कार्यालय आणण्यासंदर्भात केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री भूपेंद्र यादव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्यामुळे औद्योगिक विकासास गती मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Edited By : Umesh Bambare

Narayan Rane, Udayanraje Bhosale
Pune Politics : धंगेकर-बिडकरांमधली 'दुश्मनी' रूपाली पाटलांनी संपवली ? दोघांना एकत्र आणले, फोटो काढले अन् शेअरही केले

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com