Pune Municipal Corporation Sarkarnama
प्रशासन

Pune Municipal Corporation: लिपिक, अतिक्रमण निरीक्षकाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती; पण कनिष्ठ अभियंत्यांचे काय ?

Municipal Corporation News: मागील वर्षी झालेल्या पदभरतीमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती सात महिन्यांपासून रखडली होती.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पुणे महापालिकेच्या माध्यमातून मागील वर्षी झालेल्या पदभरतीमधील रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती गेल्या सात महिन्यांपासून रखडली होती. अखेर सात महिन्यानंतर यामधील लिपिक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांच्या नियुक्तीचे आदेश प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे लिपिक आणि अतिक्रमण निरीक्षकाच्या यादीतील उमेदवारांना अनेक दिवसांनंतर दिलासा मिळाला.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाची यादी अद्यापही खोळंबलेली आहे. त्यामुळे आता या यादीतील उमेदवारांची नियुक्ती कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महापालिकेत १० वर्षानंतर मोठी भरती करण्यात आली. त्यामध्ये लिपिक २००, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक १०० आणि १३५ कनिष्ठ अभियंत्यांच्या जागा होत्या. लेखी परीक्षा घेऊन गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत पात्र उमेदवारांना नोकरीत सामावून घेतले.

लिपिकांच्या १९, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकांच्या ७ आणि कनिष्ठ अभियंत्याच्या १० जागा रिक्त होत्या. अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याने तीन कनिष्ठ अभियंत्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्याच्या १३ जागा रिक्त आहेत. तीन जागांसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

प्रशासनाने रिक्त जागा भरण्यासाठी प्रतीक्षा यादी जाहीर केली होती. पण त्यांना सेवेत सामावून घेण्याचा अंतिम निर्णय केला जात नव्हता. सुमारे तीन आठवड्यापूर्वी आयुक्तांनी हा विषय मार्गी लावत या उमेदवारांची नियुक्ती करा, असे आदेश दिले. अखेर मंगळवारी लिपिक व सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकपदासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली.

पण कनिष्ठ अभियंत्यांची यादी अद्याप लावलेली नसल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. तर याबाबत अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी प्रतिक्रिया दिली असून "लिपिक आणि सहाय्यक अतिक्रमण निरीक्षकपदाच्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता पदासंदर्भात देखील पुढील काही दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल, असे अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT