Mumbai News : केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) आज बुधवार (दि. 28 फेब्रुवारी) ज्येष्ठ सनदी अधिकारी एस चोकलिंगम यांची तोंडावर असलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्या हाती आता राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी असणार आहे. (Latest Marathi News)
निवडणूक आयोगाने या नियुक्तीची घोषणा ट्विटरवर (X) केली आहे. 1996 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे (IAS) अधिकारी चोक्कलिंगम हे महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य अधिकारी श्रीकांत एम देशपांडे यांच्या जागी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election) 1996 बॅचमधून प्रशासकीय सेवेत आलेले सनदी अधिकारी एस. चोकलिंगम यांची राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सद्या या जागेवर सनदी अधिकारी श्रीकांत देशपांडे कार्यरत आहेत. तसेच राज्य सरकारनं माजी सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे. पुढील 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.