Sharad Pawar, Jayant Patil
Sharad Pawar, Jayant Patilsarkarnama

NCP News : गट नव्हे, पक्ष असाच उल्लेख करा; जयंत पाटलांचे मीडियाला आवाहन

Jayant Patil त्यानंतरही मीडियातून शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी शरद पवार गट असेच संबोधण्यात येत असल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर निवेदन देऊन मीडियाला आवाहन केले.
Published on

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुळ राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळाले. त्यानंतर आयोगाने शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव देऊन तुतारी हे चिन्ह दिले. तरीही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार गट असे म्हणत होते. त्यावरुन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाला पत्र पाठवून यापुढे गट नव्हे पक्ष असा उल्लेख करावा, असे आवाहन केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने विधीमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार यांचा गट मुळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचे सांगूत त्यांनाच पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिलं. तसेच खासदार शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष व चिन्हावरील हक्क फेटाळून लावला. तसेच नवीन पक्ष व चिन्हाच्या नावासाठी तीन पर्याय देण्याची सूचना केली होती.

त्यानुसार श्री. पवार यांनी तीन चिन्हे सुचवली होती. आयोगाने त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे नाव देत 'तुतारी वाजविणारा माणूस' हे चिन्ह दिले. त्यानंतरही मीडियातून शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेच संबोधण्यात येत असल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर निवेदन देऊन मीडियाला आवाहन केले.

Sharad Pawar, Jayant Patil
Jayant Patil : खळबळजनक! अजित पवार नाही तर जयंत पाटील फडणवीसांची पहिली पसंत...

यामध्ये त्यांनी म्हटलंय की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार व पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या दोन्ही गोष्टी पूर्णत: स्पष्ट झाल्या आहेत. त्यामुळे मीडियाने पक्षाचे संपूर्ण नाव घेऊनच उल्लेख करावा. कुठेही गट या शब्दाचा उल्लेख करु नये,असे आवाहन त्यांनी केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयंत पाटील म्हणाले?

‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांच्यातर्फे व पक्षातर्फे सर्व वृत्तवाहिनींच्या पत्रकार आणि प्रतिनिधींना जाहीर निवेदन देऊन कळविण्यात येते की, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार भारतीय निवडणूक आयोगातर्फे ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ व पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या दोन्ही गोष्टी पूर्णतः स्पष्ट झालेल्या आहेत. तरी, पत्रकार व प्रतिनिधींनी पक्षाचे संपूर्ण नाव घेऊन उल्लेख करावा. कृपया कुठेही ‘गट’ या शब्दाचा उल्लेख करू नये अशी विनंती करणारे पत्र पोस्ट केले आहे.

Edited By : Umesh Bambare

Jayanat Patils Letter to Media
Jayanat Patils Letter to MediaNCP Sharadchandra Pawar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com