Pune Lok Sabha Election 2024 : पुण्यात भाजपचा उमेदवार कोण ? मुरलीधर मोहोळांचा मोठा खुलासा

Murlidhar Mohol : पुण्यात भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेण्यात येत आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar MoholSarkarnama

Pune Political News : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. पुण्यात भाजपकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचं नाव घेण्यात येत आहे. आता मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी बोलताना लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

"पक्षाने माझ्यावर पुणे लोकसभेच्या निवडणूक प्रमुखाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी आमची असणार आहे. मी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलो तरी निवडणूक प्रमुख म्हणून प्राथमिक जबाबदारी माझी पक्षाचा उमेदवार निवडून आणणे ही असणार आहे", असे मत मुरलीधर मोहोळ यांनी मांडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Murlidhar Mohol
Prakash Ambedkar News : आघाडीबाबत पुण्यातील सत्ता परिवर्तन महासभेत प्रकाश आंबेडकरांनी केलं मोठं विधान,' म्हणाले...

"पक्षाचा पदाधिकारी आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाने संधी दिल्यास मी निश्चित निवडणूक लढवेल. मात्र भाजपमध्ये उमेदवार निवडीची एक प्रोसेस असते. यामध्ये कोण इच्छुक आहे, हे न पाहता पक्षाला कोण योग्य उमेदवार वाटतो, हे महत्त्वाचं असून पक्ष ज्याला उमेदवार बनवेल, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. आता मी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून तयारी सुरू केली आहे. पक्षाने कोणालाही ती उमेदवारी दिली अथवा मला दिली तरी माझं काम सुरूच राहणार आहे", असंही मोहोळ म्हणाले.

"2019 मध्ये भाजपने ज्या 23 लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या. त्या जागांवरती उद्या निरीक्षक पाठवले जाणार आहेत. माझ्यावर सोलापूरची जबाबदारी असल्याने मी सोलापूरचा निरीक्षक म्हणून जाणार आहे. तर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे पुण्याचे निरीक्षक म्हणून उद्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर ते पुणे लोकसभेबाबतचा रिपोर्ट तयार करून राज्याला पाठवतील आणि राज्याकडून तो रिपोर्ट केंद्र सरकारकडे जाईल, अशी भाजपची सिस्टीम आहे", असं मोहोळ यांनी सांगितलं.

मी पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. ही भावना निरीक्षकांसमोर मांडणार असून माझ्याकडे सोलापूरची जबाबदारी असल्यामुळे मी त्या ठिकाणी बैठक घेण्यास जाणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुणे लोकसभेची निवडणूक लढणार असतील तर आम्हाला आनंदच होईल. मात्र पक्ष काय विचार करतोय, याबाबत आम्हाला कल्पना नसून जर तरच्या गोष्टींवरती विश्वास ठेवण्यात अर्थ नसल्याचं मोहोळ यांनी स्पष्ट केलं.

(Edited By-Ganesh Thombare)

Murlidhar Mohol
Nanded Politics : नांदेड जिल्ह्याची महाविकास आघाडीची जबाबदारी आता पवार- ठाकरेंवरच..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com