Anil Deshmukh-Sachin Waze sarkarnama
प्रशासन

सचिन वाझेने घेतली माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचीच झाडाझडती!

आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या सुनावणीचा अहवाल महिन्याभरात सादर केला जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : ॲंटिलिया स्फोटके आणि कथित शंभर कोटी वसुली आदी प्रकरणांमधील मुख्य आरोपी सचिन वाझे (Sachin Waze) याने आज (ता. २१ जानेवारी) चांदिवाल आयोगाकडे चक्क माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. विशेष म्हणजे आयोगानेही त्याला ही परवानगी दिली आणि वाझेने आपल्याच ‘माजी बॉस’ची झाडाझडती घेतली. (Sachin Waze asked questions to former Home Minister Anil Deshmukh)

कथित शंभर कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती कैलास चांदिवाल यांचा एकसदस्यीय आयोग नेमण्यात आली आहे. चांदिवाल आयोगापुढे सध्या सचिन वाझे आणि माजी गृहमंत्री देशमुख यांची सुनावणी सुरू आहे. त्यावेळी वाझे याने चक्क देशमुख यांना प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली आणि आयोगानेही वाझे याची मागणी मंजूर केली. दरम्यान, आतापर्यंत सहा जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या सुनावणीचा अहवाल महिन्याभरात सादर केला जाणार आहे.

दरम्यान, आयोगाकडून परवानगी मिळताच वाझे यानेही आपले ‘माजी बॉस’ असलेले गृहमंत्री देशमुख यांची उलटतपासणी केली. त्यात वाझे याने देशमुखांना विचारलेले प्रश्न :

सचिन वाझे : मुंबई माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर गेल्या वर्षी ३० मार्च रोजी जारी करण्यात आलेल्या जीआरची माहिती तुम्हाला होती का?

अनिल देशमुख : परमबीर यांनी त्यांच्या पत्रात केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. या प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना चौकशी सुरू करण्याची विनंती केली होती.

वाझे : माझा प्रश्न असा आहे की, ३० मार्च रोजीच्या सरकारी ठरावात तुमचा सहभाग होता?

देशमुख : मी नाही म्हटलं आहे. मी मुख्यमंत्र्यांना समिती नेमण्याची विनंती केली होती.

वाझे : तुम्हाला त्या जीआरबद्दल कधी कळले?

देशमुख : जीआर पब्लिक डोमेन आहे, म्हणून मला कळले.

वाझे : स्पेशल आयजी किंवा आयजी (पोलिस) यामध्ये काही वेगळे आहे का?

देशमुख : मला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे नाही

वाझे : मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी डीजीपींना अहवाल द्यावा, असे म्हणणे योग्य ठरेल का?

देशमुख : नियमांनुसार करावं लागतं.

वाझे : गुन्हे शाखेचे सहआयुक्तांना आयुक्त, डीजीपी, एसीएस होम यांना अहवाल द्यावा लागतो.

देशमुख : केवळ आयुक्तांनाच.

वाझे : मुंबईचे आयुक्त होण्यापूर्वी हेमंत नगराळे हे डीजीपी होते.

देशमुख : हो

वाझे : मला सीआययूचा मुख्य प्रभारी बनवण्यात आल्याचे तुम्हाला कधी कळले?

देशमुख : मला काही तक्रारी आल्या की, वऱ्हे यांना 14-15 वर्षांसाठी निलंबित करून त्यांना सीआययूचा प्रभारी बनवण्यात आलं. साधारणतः सहसा, निलंबित अधिकाऱ्याला साइड पोस्टिंग दिले जाते, जरी ते साइड पोस्टिंगवर होते परंतु एक दिवसासाठी. सिंग यांच्या तोंडी आदेशानंतर वाजे यांना सीआययूचे प्रभारी बनवण्यात आले. यानंतर सहआयुक्त गुन्हे संतोष रस्तोगी यांनीही विरोध केला.

वाझे : तुम्ही सांगू शकता की, असा काही नियम आहे की, ज्या अंतर्गत एपीआयला युनिटचा प्रभारी बनवता येत नाही

देशमुख : एखादा नियम असेल

वाझे : तुम्हाला भेटीबद्दल कधी कळालं?

देशमुख : सचिन वाझेला सीआयूचा इन्चार्ज 10 जून रोजी केलं होतं. मला काही दिवसांनी तक्रारी मिळाल्या, तेव्हा समजलं.

वाझे : कोणी तक्रार केली?

देशमुख : अनेक तक्रारी तोंडी होत्या. पण कदाचित अनेक लेखी तक्रारीही विभागाकडे आल्या आहेत.

दरम्यान, मुंबईचे पोलिस सहआयक्त मिलिंद भारंबे यांनाही साक्षीदार म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात यावे, असा अर्ज मुंबई पोलिस दलातील माजी अधिकारी सचिन वाझे याने केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी (ता. २४ जानेवारी) ठेवण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT