Pune News : पुण्यातल्या ससून या शासकीय रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. उंदीर चावल्यामुळे रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. रुग्णालय प्रशासनावर धारेवर धरत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे ससून रुग्णालयाचा ढिसाळ नियोजनाचा चेहरा पुन्हा एकदा समोर आले आहे. (Latest Marathi News)
याआधी ससून रुग्णालय ड्रग्ज प्रकरणामुळे माध्यमांच्या चर्चेत आले होते. हे प्रकरण संपत नाही तोवर उंदीर प्रकरणामुळे पुन्हा ससून हाॅस्पिटल चर्चेत आले आहे. उंदीर चावल्यामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, असा आरोप करत संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने मोठा गोंधळ उडालाय. उंदीर चावून रुग्णालयातच रुग्ण दगावणार असेल तर ही जबाबदारी कोण घेणार? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
पुण्यातल्या ससून रुग्णालयात मागील दहा दिवसांपासून सागर रेणुसे नावाचा रुग्ण उपचाराधीन होते. उपचार सुरु असताना आणि विशेष म्हणजे आयसीयू वार्डमध्ये दाखल केलेला असताना रेणुसे यांना उंदीर चावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. ससून रुग्णालयाच्या वतीने प्रशासनाकडून रुग्णांच्या नातेवाईकांना जो रिपोर्ट देण्यात आला, त्यामध्ये स्पष्टपणे रुग्णाला उंदीर चावल्याचा उल्लेख आढळून आला आहे. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिला. या संदर्भात जोपर्यंत ससूनच्या प्रशासनावर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यातच घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.
"या उंदीर प्रकरणी ससून रुग्णालयातील डीन विनायक काळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, "आमच्या रुग्णालयात ससूनमध्ये असा काही प्रकार खरंच घडला आहे का? याबाबत चौकशी समिती तयार करुन माहिती घेतली जाईल. रुग्णाला खरंच उंदीर चावला होता का? याचा आम्ही शोध घेऊ," असे डीन काळे म्हणाले.
:हा रुग्ण ससूनमध्ये (Sasoon Hospital) 16 मार्चला अॅडमीट झाला होता. दारु पिऊन पडल्यामुळे त्याचे दोन्ही पाय निकामी अवस्थेत होते. 29 तारखेपासून तो आमच्याकडे व्हेंटिलेटरवर होता. 1 तारखेला आमच्याकडे सकाळीच तक्रार आली की या रुग्णाला उंदराने चावा घेतला आहे. मात्र उंदीर चावणे आणि त्याच्या मृत्यू हे दोन्ही गोष्टी जोडणं योग्य नाही. आम्ही याची सर्व चौकशी करू," अशी प्रतिक्रिया डीन काळे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.